खालापूर मुस्लिम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी मार्फत उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप
खालापूर मुस्लिम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी मार्फत उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप... खोपोली (शिवाजी जाधव) : शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी खालापूर तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमी सहबागी असलेल्या खालापूर मुस्लिम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी पटेल नगर शिळफाटा मार्फत खोपोलीतील क्रांतीनगर याठिकाणी असलेल्या उर्दू बालवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खालापूर मुस्लिम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे जाकीर हुसेन बस्तविक, कमाल पटेल, याह्या खान, शमसेर आलम , फारुक मजकूर, अकबर शेख, पठाण सर, मुजफ्फर सर, आलताब सर, मुर्तजा सर, आंजू मॅडम यांबरोबर अहमद खान, सलीम शेख , आलम मजार खान, आलम अन्सारी, हारून जमाल मनिहार, मुस्ताक शेख, अब्दुल अनवर खान, नमाज गौरी, प्रेमचंद यादव यांसह अनेक पदाधिकारी सदस्य व मान्यवर उपस्थित होते. खालापूर मुस्लिम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी मार्फत विविध सामाजिक उपक्रमे राबवली जातात. त्यातील शाळकरी गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप, आर्थिक परिस्थिती नसलेल्या अनाथ मुलींचे लग्न, शैक्षणिक क्षेत...