Posts

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ड्रायवर च्या हलगर्जीपणामुळे पादचाऱ्याचा मृत्यू

Image
  मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ड्रायवर च्या हलगर्जीपणामुळे पादचाऱ्याचा मृत्यू देवा पवार - रसायनी ३१ मार्च रोजी मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरुन मुंबईहुन पुण्याकडे जात असताना रसायनी परिसरातील रिस गावाच्या हद्दीमधे इनोव्हा कारला अपघात झाला.    मुंबईहुन पुण्याकडे जात असताना इनोव्हा क्रिस्टा कार क्रमांक एम.एच.०२ एम .जी ७१२३ या गाडी चालकाच्या   हलगर्जी पणामुळे रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.    या अपघातातील आरोपी कार चालक कृष्णा दत्तात्रय खामकर, वय 47 वर्ष, रा. आतकरवाडी, पो. डोणजे, पुणे याने हलगर्जीपणाने गाडी चालऊन रस्ता दुरुस्तीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरीकेटला जाऊन जोरात धडक दिली. तर त्याचवेळी तेथून जाणाऱ्या रघुवीर लक्ष्मण हलकाई, रा. पठारी, मध्यप्रदेश यास जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.      याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात आरोपी कृष्णा खामकर विरोधात भा.दं.वि कलम 304(अ), 279, 337 मोटार वाहन ऍक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक एम लहांगे घटनेचा पुढील तपास करत आहेत.

रायगड जिल्ह्यातील धनगर समाज आजही सुविधांपासून वंचित

Image
रायगड जिल्ह्यातील धनगर समाज आजही सुविधांपासून वंचित    राज्यकर्त्यांनी समाजाचा केला फक्त वापर - प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे          खालापूर - दत्तात्रय शेडगे     कोकण आणि रायगड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वाड्या वस्त्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून राज्यकर्त्यांनी फक्त समाजाचा मतदाना पुरता वापर केला असून समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केला आहे.    ते आयोजित खालापूर (गोळेवाडी )येतील जनजागृती मेळाव्यात बोलत होते, ऑल इंडिया धनागर समाजाच्या माध्यमातून युवकांना एकत्र करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही संघटना अहोरात्र मेहनत घेत असून समाजातील मुले मुली शिकल्या तर समाजाची शैक्षणिक प्रगती बरोबर आर्थिक प्रगती होईल,    कोकणासह रायगड जिल्ह्यातील खालापूर, कर्जत तालुक्यातील धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यांवर आजही रस्ता वीज आणि पाण्याची सोय नाही.   नुकताच देशाला स्वातंत्र्य मिळून एकीकडे ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे अमृत महोत्सव साजरा केला परंतु आमच्या समाजाचा आजही विकास झाला नसून आमचा समाज श

ऑल इंडिया धनगर महासंघ रायगडची कार्यकारिणी जाहीर

Image
ऑल इंडिया धनगर महासंघ रायगडची कार्यकारिणी जाहीर     जिल्हाध्यक्षपदी प्रकाश उघडे रायगडकर, तर उपाध्यक्षपदी सुनील कोकळे  दत्तात्रय शेडगे - खोपोली     ऑल इंडिया धनगर महासंघ रायगडची कार्यकारिणी जाहीर झाली रायगड जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश उघडे तर उपाध्यक्ष पदी सुनील दादू कोकले यांची नुकतीच निवड करण्यात आली,       महाराष्ट्रात धनगर समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी दऱ्याखोऱ्यात जाऊन मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून देवून समाजात शिक्षणाची क्रांती घडवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे हे अहोरात्र मेहनत घेत असून गोर गरीब वंचित मुलांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी मेहनत घेत आहेत,          रायगड जिल्ह्यातही शिक्षणाची क्रांती घडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करीत असून नवीन कार्यकारणीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत, यासाठी त्यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.    ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी संतोष झिमा घाटे, डॉ राजाराम हुलवान, मारुती गोरड, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सचिव पदी अरुणा अण्णासाहेब वावरे,रायगड जिल

नागोठणे स्थानकात रेल्वेतून पडल्याने तरुणाने गमावला पाय

Image
नागोठणे स्थानकात रेल्वेतून पडल्याने तरुणाने गमावला पाय नागोठणे/प्रतिनिधी :-      नागोठणे रेल्वे स्थानकात प्रवासी रेल्वेतून पडून जखमी व मृत्यू होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाचप्रकारे सोमवारी (दि.18) सायंकाळी 8.25 वाजण्याच्या सुमारास रेल्वेतून तोल जावून पडल्याने अथर्व संतोष पोकळे हा तरुण प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. या आपघातात अथर्व याच्या तोंडाला मार लागला असून उजव्या पायाचा ढोप्याच्या खालील भाग कापला गेल्याने ऐन उमेदीतील या तरुणाला पाय गमवावा लागला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून अथर्व या अपघातातून वाचल्याचे बोलले जात आहे. जखमी तरुणावर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नेरूळ येथे तातडीने नेण्यात आले. तेथे पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि. हरेष काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस करीत आहेत. नागोठणे रेल्वे स्थानकात हा अपघात घडला त्यावेळी स्थानकात रेल्वे पोलिस फोर्सचे कुणीही कर्मचारी स्थानकात नव्हते. त्यामुळे याच रेल्वेतून आलेल्या नागोठण्यातील काही तरुण प्रवाशांनी जखमी

आ. महेंद्र थोरवेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

Image
आ. महेंद्र थोरवेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण    यशवंत नगरमधील नागरिकांनी केले आमदारांचे कौतुक खोपोली - खालापूर तालुक्यातील खोपोली नगरपरिषद हद्दीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते दिनांक 11 मार्च रोजी पार पडला.. खोपोली शहरातील यशवंत नगर परिसरात विविध ठिकाणी प्रलंबित असलेली कामे त्याचबरोबर स्थानिकांना भेडसावत असलेल्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी आमदारांनी कंबर कसली असून यशवंत नगर येथिल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या प्रयत्नातून व मागणी नुसार लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी अनेक कामांचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन समारंभ संपन्न केला तसेच खोपोली शहरात विकास कामांचा सपाटा सुरूच ठेवला असून प्रामुख्याने पाणी , रस्ते , गटार याबरोबरच विविध कामाचे वैशिष्ट्य पूर्ण योजने अंतर्गत व दलित वस्ती योजने अंतर्गत मूलभूत समस्या कशाप्रकारे सोडवता येऊ शकते यासाठी आमदार प्रयत्नशील असून शब्दाला जागणारा आमदार म्हणून महेंद्रशेठ थोरवे यांनी आपली ओळख नि

तुराडे ग्रामपंचायतीच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा

Image
तुराडे ग्रामपंचायतीच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा रसायनी / प्रतिनिधी : तुराडे ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिलांना रोजच घरातली कामे असतात. त्यांना कुठेतरी विरंगुळा मिळावा त्यासाठी महिलांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि गणेशाचे पूजन करून करण्यात आले.    यावेळी महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मेघा देशपांडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी महिला दिनाचे महत्व सांगताना आजच्या काळात महिलांना समान अधिकार मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्याचे सांगितले. जर महिलापण नोकरीं करत असेल तर पुरुषानेही घरात कामात मदत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. टीव्ही आणि मोबाईलच्या वापरामुळे हल्ली मुलं मुली लवकर वयात येत असल्याचे सांगून नको त्या वयात अनावश्यक गर्भधारणा होत असल्याने चिंता व्यक्त केली.