सुरेश टोकरे, भाई शिंदे आणि सुनील पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि माजी उपाध्यक्ष भाई शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश
खोपोली : शिवाजी जाधव
कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक जवळ आल्याने दररोज नवनवीन घडामोडी घडत असून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा विरोधकांना धक्का दिला असून जिल्हा परिषदेचेw माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी( शरद पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, आणि उबाठा गटाचे जेष्ठ नेते माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रघुनाथ भाई शिंदे, डॉ सुनील पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला, त्यामुळे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचे पारडे जड झाल्याचे पाहायला मिळत आहे,
या मतदार संघात महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचे मोठे आव्हान उभे केले आहे
त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनाही जोरदार संघटना बांधणी केली असून घटक पक्षांना एकत्र घेत विरोधकांना झटका दिला आहे.
Comments
Post a Comment