गुरुकुल ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचेे उद्घाटन मोठ्या दिमाखात
नवी मुबंई येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल येथे गो २०२४ गुरुकुल ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात
चौक :- प्रतिनिधी
नवी मुबंई येथील श्री स्वामिनारायण आंतरराष्ट्रीय गुरुकुल शाळेत " गो २०२४ गुरुकुल ऑलिम्पिक " क्रीडा स्पर्धेचे उदघाट्न पंचायत समिती खालापूर चे गटशिक्षणाधिकारी कैलास चौरमले सर, चौक पोलीस निरीक्षक मनीष मोरे सर, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे सर,श्री स्वामिनारायण आंतरराष्ट्रीय गुरुकुल नवी मुंबई चे संचालक परमपूज्य विश्वमंगलदासजी स्वामीजी, ब्रम्हस्वरूपदासजी स्वामीजी, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. पी. हरिबाबू रेड्डी सर,खालापूर पोलीस स्टेशन स्टाफ चे
शरद हिवाळे सर,गोपनीय विभागचे समीर पवार सर,रिलायन्स फाऊंडेशन शाळेचे चलमले सर,आसरे गावचे उपसरपंच अनिकेत निकम,माजी उपसरपंच सुनील गायकवाड यांच्या शुभहस्ते झाले.
या गो ऑलिम्पिक २०२४ मध्ये विविध प्रकारच्या खेळाचा समावेश करण्यात आला असून त्यात बुद्धिबल, कॅरम, 100 मी धावणे, 400 मी धावणे,२०० मी धावणे, रिले स्पर्धा,डॉच बॉल, बास्केटबॉल,हॉलिबॉल,कबड्डी, क्रिकेट,फुटबॉल, बॅडमिंटन, थ्रो बॉल अशा विविध अनेक स्पर्धा या गो २०२४ गुरुकुल ऑलिम्पिक चषकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळण्यास मिळणार आहे.
या ऑलिम्पिक २०२४ क्रीडा स्पर्धेतून असंख्य खेळाडू जोडणार असून खालापूर तालुक्यातील खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण होणार आहे.ही स्पर्धा ४ डिसेंबर २०२४ ते ६ डिसेंबर २०२४ पर्यत सुरु राहणार असून ७ डिसेंबर २०२४ रोजी विजेत्या संघास गो २०२४ गुरुकुल ऑलिम्पिक हा चषक देण्यात येणार आहे.या स्पर्धेत खालापूर व पनवेल तालुक्यातील रिलायन्स फाऊंडेशन मराठी व इंग्रजी माध्यम शाळा,सेंट जोसेफ लोधिवली,श्री स्वामिनारायण गुरुकुल, पलोटी स्कुल,विल्फ्रेड ,टी एन एम स्कुल,जे एन म्हात्रे स्कुल,गुड सेफ़र्ड, एस व्ही पी एस, एस डब्लू एस पी,जनता विद्यालय खोपोली अशा जवळपास १३ शाळांनी सहभागी होऊन आपले खेळातील उत्कृष्ट गुण दाखविणार आहेत.
Comments
Post a Comment