तुराडे ग्रामपंचायतीच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा

तुराडे ग्रामपंचायतीच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा



रसायनी / प्रतिनिधी : तुराडे ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिलांना रोजच घरातली कामे असतात. त्यांना कुठेतरी विरंगुळा मिळावा त्यासाठी महिलांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि गणेशाचे पूजन करून करण्यात आले.
   यावेळी महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मेघा देशपांडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी महिला दिनाचे महत्व सांगताना आजच्या काळात महिलांना समान अधिकार मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्याचे सांगितले. जर महिलापण नोकरीं करत असेल तर पुरुषानेही घरात कामात मदत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. टीव्ही आणि मोबाईलच्या वापरामुळे हल्ली मुलं मुली लवकर वयात येत असल्याचे सांगून नको त्या वयात अनावश्यक गर्भधारणा होत असल्याने चिंता व्यक्त केली.
   पुढे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. तर यावेळी रसायनी पोलीस स्टेशनच्या महिला पी.एस.आय. श्रीम. मीनल शिंदे बोलताना म्हणाल्या की महिलांनी अन्याय सहन करता वेळीच त्याला विरोध करणे गरजेचे आहें. कारण महिलांना समाजात मदत त्वरित मिळते. नुसतं ओरडलं तरी "काय झालं ताई" म्हणून चार पाच जण विचारतात आणि मदत करायची तयारी असते. जर कोणी पुरुषाने अशी खोड काढली तर सहन न करता मदत घेऊन त्याला चोप दिला तर तो पुन्हा कधी खोडी काढणार नाही असे मत व्यक्त केले.
    तसेच डॉ. हर्षा वासकर यांनी महिलांना आपण मेकअप करताना योग्य असे कॉस्मेटिक वापरले पाहिजे. जर चुकीचे वापरले तर आपली स्किन खराब होते. त्या कॉस्माटिकलॉजिस्ट असल्याने लवकरच रसायनी परिसरामध्ये सेंटर सुरु करणार असल्याचे सांगितले, जेणे करून येथिल रसायनी परिसरातील महिलांना त्यांचा फायदा होईल असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे विविध खेळ मोठया उत्सहात पार पडले. त्यामुळे महिला वर्गामध्ये समाधान दिसत होते. यावेळी आलेल्या महिलांना अल्पोपहार देण्यात आला. यावेळी तारा सुरेश ठाकूर मा. जि.प. सदस्य, निशाताई ठाकूर मा. सभापती पनवेल पंचायत समिती उपस्थित होते.
    आलेल्या मान्यवरांचे स्वागत सरपंच रंजना गायकवाड, उपसरपंच रिया माळी, सदस्या लीना ठाकूर, मालती वाघमारे, स्नेहा गायकर, वृषाली पाटील, ग्रामसेवक अस्मिता मोकल यांच्या हस्ते करण्यात आला.
    यावेळी डॉ. अंजली योगेश केणे, रा.जि.प.शाळा तुराडे मुख्याध्यपिका पाटील मॅडम, सी.आर.पी. साधना पाटील, तसेच दीपज्योती ग्रामसंघ अध्यक्ष दीपिका ठाकूर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामपंचायत तुराडे कर्मचारी वर्ग, तुराडे ग्रामस्थ, महिला मंडळ, कष्टकरीनगर ग्रामस्थ आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती