मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ड्रायवर च्या हलगर्जीपणामुळे पादचाऱ्याचा मृत्यू

 मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ड्रायवर च्या हलगर्जीपणामुळे पादचाऱ्याचा मृत्यू




देवा पवार - रसायनी

३१ मार्च रोजी मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरुन मुंबईहुन पुण्याकडे जात असताना रसायनी परिसरातील रिस गावाच्या हद्दीमधे इनोव्हा कारला अपघात झाला.

   मुंबईहुन पुण्याकडे जात असताना इनोव्हा क्रिस्टा कार क्रमांक एम.एच.०२ एम .जी ७१२३ या गाडी चालकाच्या   हलगर्जी पणामुळे रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. 

  या अपघातातील आरोपी कार चालक कृष्णा दत्तात्रय खामकर, वय 47 वर्ष, रा. आतकरवाडी, पो. डोणजे, पुणे याने हलगर्जीपणाने गाडी चालऊन रस्ता दुरुस्तीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरीकेटला जाऊन जोरात धडक दिली. तर त्याचवेळी तेथून जाणाऱ्या रघुवीर लक्ष्मण हलकाई, रा. पठारी, मध्यप्रदेश यास जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

     याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात आरोपी कृष्णा खामकर विरोधात भा.दं.वि कलम 304(अ), 279, 337 मोटार वाहन ऍक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक एम लहांगे घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती