आ. महेंद्र थोरवेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

आ. महेंद्र थोरवेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
   यशवंत नगरमधील नागरिकांनी केले आमदारांचे कौतुक
खोपोली - खालापूर तालुक्यातील खोपोली नगरपरिषद हद्दीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते दिनांक 11 मार्च रोजी पार पडला.. खोपोली शहरातील यशवंत नगर परिसरात विविध ठिकाणी प्रलंबित असलेली कामे त्याचबरोबर स्थानिकांना भेडसावत असलेल्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी आमदारांनी कंबर कसली असून यशवंत नगर येथिल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या प्रयत्नातून व मागणी नुसार लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी अनेक कामांचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन समारंभ संपन्न केला तसेच खोपोली शहरात विकास कामांचा सपाटा सुरूच ठेवला असून प्रामुख्याने पाणी , रस्ते , गटार याबरोबरच विविध कामाचे वैशिष्ट्य पूर्ण योजने अंतर्गत व दलित वस्ती योजने अंतर्गत मूलभूत समस्या कशाप्रकारे सोडवता येऊ शकते यासाठी आमदार प्रयत्नशील असून शब्दाला जागणारा आमदार म्हणून महेंद्रशेठ थोरवे यांनी आपली ओळख निर्माण केली असून आमदारांच्या कामाचे कौतुक जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रमासाठी खोपोली नागरपरिषद मुखाधिकारी डॉ.पंकज पाटील , आर पी आय जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड , माजी नगराध्यक्ष डॉ सुनील पाटील , माजी नगरसेवक मोहन औसरमल , शिवसेना शहर अध्यक्ष संदीप पाटील , rpi शहर अध्यक्ष नितीन वाघमारे , चिंतामण सोनावणे , माजी नगर सेवक संजय पाटील , उद्योजक नंदू ओसवाल , अमोल शहाणे , आर पीआय कार्यकर्ते सिद्धार्थ गायकवाड , गजानन महाडिक , प्रवीण महाडिक ', माजी नगर सेवक राजेंद्र फक्के , हरीश काळे , मुन्ना शेख, निलेश परदेशी, लखन पवार, राकेश देशमुख,राजेश पाटील पवार,राकेश चव्हाण,संजय दळवी, फाहरुख शेख, आयाज शेख, अझर राजपूत, फाहरुख माचकुरे, विठ्ठल पवार, मनोज खंडागळे, निखिल गुरव,अशोक सकट, कैलास ठाकूर, असंख्य महिला व नागरिक उपस्थित

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती