माडभूवन आदिवासी वाडीला पिण्याच्या पाण्यासाठी बोअर आणि शाळेसाठी वर्ग खोली बांधून देणार, रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई चे स्तुत्य उपक्रम
माडभूवन आदिवासी वाडीला पिण्याच्या पाण्यासाठी बोअर आणि शाळेसाठी वर्ग खोली बांधून देणार, रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई चे स्तुत्य उपक्रम
वावोशी/जतिन मोरे :- माडभुवन आदिवासी वाडी येथे शाळेच्या वर्ग खोली बांधकामाचे भूमी पूजन कार्यक्रम संपन्न झाले. माडभुवन या टँकर ग्रस्त वाडीला रोटरी क्लबच्या माध्यमातून बोअर आणि शाळेला वर्ग खोली बांधून देणार या आनंदाने ग्रामस्थांनी महाजनी साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचे आदिवासी बांधवांकडून सत्कार करण्यात आले. तसेच गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी जिल्हा परिषद चे माध्यमातून अनेक विकास कामे mbrfdcdf 33या वाhडीसाठी केल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. I
गेल्या पाच वर्षाच्या कालावधी मध्ये सर्वात जास्त विकास कामे याच वाडीत केली आणि या वाडीला आदर्श वाडी बनविण्यासाठी खुप प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
तसेच माडभुवन वाडीला फक्त बोअर केली. त्या बोअर ला भरपूर पाणी लागले आहे परंतु हे पाणी वाडीपर्यंत आणण्यासाठी जो काही खर्च येईल तो खर्च रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात येईल तसेच महिला विकासासाठी स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण आणि सहकार्य करण्याचे महाजनी साहेबांनी संबोधित केले तसेच आत्मनिर्भर भारताची सुरुवात आपल्या वाडी पासून करूया असेही आवर्जून सांगितले.
यावेळी ग्रामस्थांनी संपूर्ण वाडी जंगली फुल फळांनी सजवली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होते. शेवटी नवीन वर्ग खोलीचे भूमिपूजन करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. ज्ञानेश्वर घरत, रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई चे अध्यक्ष श्री.महाजनी साहेब व त्यांच्या सौभाग्यवती मा.वंदना महाजनी तसेच सामाजिक कार्यकर्ते दर्शन भोईर ,रत्नाकर घरत,ग्राम पंचायत सदस्य दामा माडे पांडुरंग लेंडे आणि मोठ्या संख्येनं वाडीतील महिला पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.