रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती

रसायनी/राकेश खराडे 
     रसायनी येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी अंतर्गत पिल्लई एचओसी मधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्टारकर्स मोटारस्पोर्ट्स या विद्यार्थी गटाने एटीव्ही क्वाड बाईकची मोठ्या कुशलतेने निर्मिती केली असून भव्य अनावरण पिल्लईचे सिईओ सोहळा डॉ के.एम.वासुदेवन यांच्याहस्ते रसायनीत संपन्न झाला. 
    यावेळी पिल्लई महाविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी (पी. आर) डॉ. निवेदिता श्रेयांश, रसायनी डेप्युटी सी. ई. ओ. डॉ.लता मेनन, प्राचार्य डॉ. जगदीश बाकल, प्राचार्य डॉ. अमर मांगे उपस्थित होते.अनावरण सोहळ्यानंतर टिमचे अनुभवी रायडर्स नी ए.टी.व्ही बाईकचे प्रभावशाली प्रदर्शन करून त्या बाईकची पात्रता दाखवण्यात आली.



बाईक उदघाटन झाल्यानंतर चीखलात, पाण्यातून, डोंगरातून हि क्वाड बाईक चालत असल्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
  'स्टारकर्स मोटरस्पोर्ट' ही पिल्लेज एच.ओ. सी इंजिनियरींग व अभियांत्रिकी कॉलेजची एक अधिकृत टीम असून ही बहुविद्याशाखीय टीम एफ-3- कॅटेगरीची रेस वाहने निर्माण करते.महाविद्यालयाचे सी.ई.ओ - डॉ. के.एम वासुदेवन पिल्ले, डेप्युटी सी. ई. ओ- डॉ. लता मेनन, पीआर हेड निवेदिता श्रीयांश, प्राचार्य डॉ. जे.डब्लू बकाल, स्टारकर्सचे सल्लागार प्रो. के. एस. अनिश आणि प्रो. आदित्य शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सर्वतोपरी मदतीने 250 CC ATV क्वाड बाईकची निर्मिती केली. 2022 साळीही तामिळनाडू येथील मदुराई येथे या टीमने प्रभावशाली प्रदर्शन करून संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक मिळवीला असून 9 चषक वेगवेगळ्या स्पर्धेत मिळविले आहेत.

    दरम्यान 3 ते 7ऑगस्टच्या दरम्यान सागर इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी, भोपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी ही टीम आपल्या क्वाड टॉक डिजाइन चॅलेंजच्या ९-व्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे.मागील वर्षी भारतात रसायनीतील पिल्लई एज्युकेशनच्या इंजिनिअर आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता.यावर्षी होणाऱ्या स्पर्धेत भारतातून पहिला नंबर पटकाविण्याचा मानस आहे.
   मागच्या क्वाड बाइकपेक्षा या क्वाड बाइकमध्ये खूप सुधारणा करण्यात आल्या आहेत. वजनामध्ये कमी असून यांत्रिकी कौशल्यात चांगली अशी ही बाईक ठरणार आहे. पिल्लई कॉलेजचे व्यवस्थापक विद्यार्थ्यांना असे नवनवीन प्रॉजेक्ट्स देऊन आपले पुस्तकी ज्ञान प्रात्यक्षिकाने जगापुढे आणत आहेत त्यामुळे इंजिनिअरींग आणि अभियांत्रिकी विभागाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*