*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*
वावोशी/जतिन मोरे :-  काल बुधवार दिनांक २३ ऑगस्ट २०२३ हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी आनंदाचा ठरला. चांद्रयान-३ चे लँडर यशस्वीपणे चंद्रावर उतरल्यानंतर अवघा देश आनंदाने भारावून गेला आहे. भारतात सगळीकडे उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे आणि याच प्रसंगाचे औचित्य साधून वावोशी मधील विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल ने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या देशाविषयी अभिमानाची भावना रूजावी आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच त्यांच्यामधून देशाला भावी शास्त्रज्ञ, संशोधक मिळावा या उदात्त हेतूने गुरुवारी २४ ऑगस्ट रोजी इयत्ता १ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा भरवून एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांकडून चांद्रयान-३ची यशस्वी लँडिंग दाखवणारी चित्रे काढून घेतली. 
             विद्यार्थ्यांनी याप्रसंगी चांद्रयानाची संपूर्ण माहिती तसेच या यशस्वी मोहिमेमध्ये सहभागी सर्व शास्त्रज्ञांविषयी माहिती सांगितली व शिक्षकांनी शाळेच्या प्रशस्त हॉल मध्ये काल झालेल्या चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगची व्हिडिओ क्लिप आणि फोटोज प्रोजेक्टरवर दाखवले.
इयत्ता नर्सरी ते सीनियरच्या छोट्या विद्यार्थ्यांनी आकाशामध्ये फुगे सोडून आपला आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी गोरठण बु. चे माजी सरपंच एल बी पाटील, निवृत्त प्राथमिक शिक्षक भगवान शेट्ये, निवृत्त प्राथमिक शिक्षिका नंदा शेट्ये, श्री छत्रपती विद्यालय वावोशीचे माजी मुख्याध्यापक एस .एच. पाटील सर, उद्योजक सुजित कुमार पिंगळे सर, संगीता मोरे मॅडम (ज्योतिषशास्त्रज्ञ), गायकवाड सर , प्रतीक्षा चव्हाण , गावित सर (मुख्याध्यापक श्री छत्रपती विद्यालय वावोशी), विद्याधर जाधव (पोलीस पाटील, गोरठाण बु.), जगदीश पाटील (सामाजिक कार्यकर्ते ) दीपक पाटील.(सामाजिक कार्यकर्ते ), सुरेश खरिवले (सामाजिक कार्यकर्ते ) या मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी भगवान शेट्ये गुरुजी, एल बी पाटील सर आणि श्री सुजित पिंगळे सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 
आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल शालेय प्रशासन, मुख्याध्यापिका मानसी पाटील व सहकारी शिक्षिका शर्मिला मेहेतर, निलम मोरे , भक्ती विद्वांस, वैभवी जाधव टीचर , सोनाली पाटील,  मिथिलेश टीचर, तेजल शेट्ये, शिवानी मनवे टीचर , प्रतीक्षा, प्राची बामणे व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांची समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांकडून प्रशंसा व कौतुक केले जात आहे.
चांद्रयान-३यशस्वी मोहिमेनिमित्त विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशीचे विद्यार्थी जल्लोष करताना

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती