हिल इंडिया कंपनीत चोरी करणारे आरोपी रसायनी पोलिसांच्या ताब्यात
हिल इंडिया कंपनीत चोरी करणारे आरोपी रसायनी पोलिसांच्या ताब्यात
देवा पवार - रसायनी
रसायनी परिसरात केंद्र सरकार उपक्रम असणाऱ्या हिल इंडिया (पुर्वीचे नाव एच.आय.एल) कंपनीत अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे.
कंपनीमधील सीनियर असिस्टंट चाल्स जॉर्ज यांनी रसायनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 24 जुलै रोजी हिल इंडिया लि. कंपनीतून पाईपची चोरी झाल्याची घटना घडली. सदर घटनेत एकूण 20 हजार रुपये किमतीच्या लोखंडी पाईपची चोरी झाली होती. त्याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास रसायनी पोलिसांनी केला असून सदर बाबतीत दोन आरोपींना अटक केली आहे.
सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपी अज्ञान असून यांना रसायनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी तुषार कातकरी, वय - वर्ष 19 व विश्वास सवार, वय - वर्ष 18 असून हे दोघेही पराडे गावचे रहिवासी आहेत.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास रसायनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार एस.जी.खाडये करीत आहेत.