ह.भ.प गणेश महाराज मांडे यांचे दुःखद निधन
ह.भ.प गणेश महाराज मांडे यांचे दुःखद निधन
रसायनी : देवा पवार
खालापूर तालुक्यातील रिसवाडी गावामधील समाज भूषण ह.भ.प श्री. महादेव महाराज मांडे यांचे चिरंजीव ह.भ.प गणेश महाराज मांडे यांचे शनिवार दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले.
वै. ह.भ.प गणेश महाराज मांडे यांनी त्यांचे वडील ह.भ.प श्री. महादेव महाराज मांडे यांचा वारसा जपत त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये राहून अनेकांशी जिवल्याचे नाते जोडले होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक वारकरी राजकीय शैक्षणिक लहान थोरांना त्यांच्या जाण्याने मोठा झटका बसला आहे त्यांनी सर्व समाजामध्ये वारकरी संप्रदाय ऐक्यांचे, बंधुत्त्वाचे, शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे. ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती. वारकरी संप्रदायचे असल्याने त्यांना भजन, किर्तन मृदुंग वाजवण्याकरिता याची मोठा सभाग असल्याने मुखात कायम हरीनामाचा जप असायचा. अशी व्यक्ती सोडून गेल्यांने त्यांच्या कुटुंब आणि रसायनी परिसर वारकरी सांप्रदाय खालापूर तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये शोककला पसरली आहे.
त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी श्री क्षेत्र धाकटी पंढरी साजगाव येथेहोणार असून ह.भ.प राजेश महाराज सावंत (खांबेवाडी) यांचे प्रवचन होणार आहे. तर उत्तरकार्य गुरुवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्या निवास स्थान येथे होणार असून या निमित्ताने ह.भ.प कृष्णा महाराज लांबे ( खरवई वाडी) यांचे प्रवचन होणारा आहे. त्यांच्या पश्चात त्यांची आई वडील पत्नी, मुलगी, मुलगा तसेच चुलते असा खूप मोठा परिवार आहे.