आमदार महेंद्र थोरवे यांचा विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक
खोपोली परिसरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न...
आमदार महेंद्र थोरवे यांच्या विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक
खोपोली : शिवाजी जाधव
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा मास्टर स्ट्रोक मारत खोपोली नगरपालिका हद्दीतील अनेक भागात भूमिपूजन केले.
खोपोली नगरपालिका हद्दीतील आदोशी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, मिळगाव ठाकूरवाडी कडील स्मशान भूमिकडे जाणारा रस्ता, मिळगाव धनगर वाडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन, शिळफाटा श्रीराम मंदिर येथे सभागृह आणि सुशोभीकरण, लौजी येथे हनुमान मंदिर शेजारी सभागृह बांधणे, लौजी येथे अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्याने आमदार महेंद्र थोरवे यांनी विविध विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून आज भूमिपूजन पार पडले.
यावेळी शिवसेना खोपोली शहराध्यक्ष संदीप पाटील, जेष्ठ माजी नगरसेवक मोहन औसरमल, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, शिवउधोग सेना रायगड जिल्हाप्रमुख हरीश काळे, कार्याध्यक्ष अनिल मिंडे, युवा सेना अधिकारी संतोष मालकर, माजी नगरसेवक राजू ढुमणे, शेखर जाभले, ईश्वर कासार, मिळगाव शिवसेना विभाग प्रमुख सचिन गुरसळ उपविभाग प्रमुख नाथा पाटील, युवा सेना विभाग प्रमुख संदेश पाटील, शाखाप्रमुख रोहिदास म्हात्रे, धनगरवाडा शाखाप्रमुख ओमकार घाटे, शिवसैनिक महेंद्र पाटील, ज्येष्ठ ग्रामस्थ जनार्दनदादा पाटील, परशुराम नाना पाटील, नंदूभाऊ पाटील, वसंतदादा पाटील, सतीश पाटील, योगेश भाऊ कदम, सागर ढेबे, सुरेश शेडगे, महेश मरगळे, शेवाळे काका, विलास उकेरी, व समस्त महिला भगिनी आदिसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.