रिसमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस

रिसमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस
     7 जणांना बाधा केल्याची हॉस्पिटलमध्ये नोंद

रसायनी : प्रतिनिधी 
     रसायनीतील रिस-कांबा परिसरामध्ये आज संध्याकाळी एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस माजवला. समोर जो भेटेल त्याला तो कुत्रा चावा घेत होता. त्यामुळे जवळच असणाऱ्या निरामय हॉस्पिटल मध्ये रुग्णांची गर्दी जमली होती. काही वेळातच कुत्रा पिसाळला असल्याची वार्ता संपूर्ण रिस परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 
       एका मागून एक रुग्ण कुत्रा चावल्याची खबर घेऊन येत असल्याने हॉस्पिटल परिसरात एकच विषय चर्चेत होता. त्याचवेळी नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच उमा मुंढे व उपसरपंच भूषण पारंगे यांना घटनेची माहिती दिली. मात्र इकडे काही वेळात कुत्रा चावल्याचे रुग्ण दोनाचे तीन, तीनाचे पाच, पाच चे सात असे वाढत गेले. कुत्रा चावून जखमी झालेल्यांपैकी एक दीड वर्षीय मुलगी, एक 6 वर्षीय मुलगा, तीन तरुण मुले (अंदाजे 26 ते 30 वयातील) व दोन महिलांचा यामध्ये समावेश आहे. 
    एकीकडे रुग्णांवरील उपचार निरामय मध्ये चालु असताना भूषण पारंगे, संदीप मुंढे, शंकर पारंगे, अभिजित घरत, प्रतीक आडाने, दिनेश चव्हान व राकेश पारंगे हे सर्व रीस मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याला शोधण्यासाठी आले. ते परिसरातील सोसायटी, बंगला एरिया आदी ठिकाणच्या गल्लीबोळातून शोध घेत होते. बराच वेळ शोध घेत असताना अचानक तो कुत्रा भूषण पारंगे यांच्या अंगावर धाऊन आला. तेव्हा शंकर पारंगे व भूषण पारंगे यांनी त्या कुत्र्याला दांडक्याच्या साहाय्याने मारले तेंव्हा नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
      मात्र तरीही काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार आणखी एक कुत्रा पिसाळलेल्या अवस्थेत भटकत आहे. तरी नागरिकांनी परिसरात वावरताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तसेच लहान मुलांसह वृद्धांची काळजी घेणे आवश्यक आहे. याचबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

ह.भ.प गणेश महाराज मांडे यांचे दुःखद निधन

आमदार महेंद्र थोरवे यांचा विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक