तुराडे ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबीर
तुराडे ग्रामपंचायत मधील महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबीर
ओटीकर, संमीथा आणि स्पेरूल फाउंडेशनने घेतला पुढाकार
रसायनी : राहुल जाधव
रसायनी परिसरातील तुराडे ग्रामपंचायत मधील महिलांसाठी नुकताच सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये महिलांना ब्युटी पार्लर व आर्थिक साक्षरता यांबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
ज्या महिलांना आपली कला व्यावसायिक दृष्टीने सादर करायची आहे, अथवा काहींना घरातूनच आपल्या कौशल्याने आर्थिक उत्त्पन्न निर्माण करायचा आहे. यांसाठी ओटीकर कंपनी, संमीथा आणि स्पेरूल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व तुराडे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी 30 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले गेले. यामध्ये महिलांना ब्युटी पार्लर चे प्राथमिक प्रशिक्षण देऊन किट देण्यात आले. तर आपली आर्थिक बचत कशी करावी, बचत केल्याचे फायदे, कोणकोणत्या माध्यमातून बचत करावी? अशा विविध मुद्द्यांच्या आधारावर आर्थिक साक्षरता प्रशिक्षणही यावेळी देण्यात आले.
एकंदरीत या शिबिरासाठी तुराडे गाव, कष्टकरी नगर, मुकुंदवाडी, ठाकूरवाडी येथील एकूण 120 महिलांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. सहभाग घेतल्याप्रकरणी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी "ओटीकर" चे भरत देशमुख, तुषार पाटील, प्रशांत पाटील, दिपक निकम, प्रतिक पाटील, बिनोद प्रसाद, प्रताप नारकर, ऋतुजा देशमुख, मिनल वैद्य, अनेसा डिसुजा, योगेश पाटील तसेच "स्पेरुल फाउंडेशन" चे सागर मानकर, आतिष कापसे, सचिन कांबळे व "संमीथा सिजीएफ" द्वारे अनिर्बन साहा आणि विनायक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे ज्यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण घडून आले ते तुराडे ग्रामपंचायत सरपंच रंजना गायकवाड, उपसरपंच मालती वाघमारे, सदस्य रिया माळी, लिना ठाकूर, स्नेहा गायकर, सचिन मते, ग्रामसेविका अस्मिता मोकल, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ गायकवाड, मयूर ठाकूर, प्रदीप माळी, ऋषिकेश माळी, मा. सदस्य निलम ठाकूर, संगीता ठाकूर, बार्टी च्या मनीषा कळके व प्रशिक्षणार्थी तरुणी व महिला आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment