खालापूर तालुक्यातील शेतकऱ्याला ट्रॅक्टरचा लाभ...
खालापूर तालुक्यातील शेतकऱ्याला ट्रॅक्टरचा लाभ...
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर प्रदान
वावोशी | जतिन मोरे
“शेती अधिक फायदेशीर व्हावी आणि शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करत यांत्रिकीकरण स्वीकारावे,” असा प्रेरणादायी संदेश देत रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रामेती प्रशिक्षण संस्था, खोपोली येथे आयोजित कार्यक्रमात राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मंजूर ट्रॅक्टरचा लाभ खालापूर तालुक्यातील शेतकरी महेश लक्ष्मण पवार यांना प्रदान केला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्राचार्य रामेती श्रीमती राजपूत, तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर, मंडळ कृषी अधिकारी नाजीम मुलाणी, उप कृषी अधिकारी सुरेश उघडा, कृषी सेवक सुमित भगत आदी मान्यवर उपस्थित होते. सदर प्रसंगी जिल्हाधिकारी जावळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत हळद लागवड वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. तसेच आधुनिक साधनांचा वापर करून शेतीतून चांगले उत्पन्न मिळविण्याची प्रेरणा दिली. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर यांनी खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन कृषी यांत्रिकीकरणासह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील केले आहे. हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला असून, आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने शेतकरी आत्मनिर्भरतेकडे पावले टाकत आहेत.
Comments
Post a Comment