नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात कर्जत-खालापूरचा अभिमानास्पद सहभाग

आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत
    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात कर्जत-खालापूरचा अभिमानास्पद सहभाग

वावोशी | जतिन मोरे
    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भव्य उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी देश-विदेशातील मान्यवर, विविध राज्यांतील दिग्गज नेते आणि हजारो नागरिक उपस्थित होते. या सोहळ्यात कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करून मतदारसंघाचा सन्मान वाढविला.
          कर्जतपासून अवघ्या एका तासाच्या अंतरावर उभे राहिलेले हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भविष्यात या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. उद्योग, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधींमुळे कर्जत-खालापूर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात कार्यरत राहून एक यशस्वी उद्योजक म्हणूनही ओळख असलेल्या आमदार थोरवे यांच्या कार्यक्षमतेची आणि संपर्क क्षमतेची झलक या प्रसंगी पुन्हा दिसून आली. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी थेट उपस्थित राहिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी आमदार थोरवे यांचे अभिनंदन केले आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघासाठी हा क्षण अभिमानाचा ठरला असून, या विमानतळामुळे परिसरात विकासाच्या नव्या दालने खुली होतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

तळोजा एम.आय.डी.सी परीसरात धावणार मेट्रो

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द