ओलमन ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ओलमन ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांचा 'बाळासाहेब भवन' येथे प्रवेश सोहळा संपन्न
वावोशी | जतिन मोरे
आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर दृढ विश्वास व्यक्त करत ओलमन ग्रामपंचायत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विनोद पादिर, सुदाम हिंदोळा, संतोष पादिर, किरण ठोंबरे, धर्मा नीरगुडा, भागा हिंदोळा, कुमार पादिर, मारुती पादिर, अजित वाघ, भूषण पुंजरा, रवी हिंदोळा, राजेश पादिर, रोहित पादिर, मनीष पारधी, रमेश पादिर, रोहन ठोंबरे, राज मेंगाळ, नीरज पादिर या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या प्रसंगी बोलताना नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “शिवसेनेत कधीही नवा-जुना असा भेदभाव केला जात नाही. येथे प्रत्येकाला समान संधी, योग्य सन्मान आणि काम करण्यासाठी बळ दिले जाते.” या सोहळ्यास युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ, माजी उपसभापती मनोहर थोरवे, विधान सभा संघटक शिवराम बदे, माजी सभापती राहुल विशे, ज्येष्ठ नेते भास्कर दिसले, उपतालुका प्रमुख भरत डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, भाऊ झुगरे, अभि शिंगोले, संतोष भुंडेरे, प्रशांत पाटील, अक्षय शिंगटे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या प्रवेशामुळे ओलमन परिसरातील शिवसेना संघटनेला अधिक बळ मिळाले असल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment