जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त ‘फिश रोग निदान व इको-फ्रेंडली तंत्रज्ञान’ विषयक प्रशिक्षण संपन्न

जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त ‘फिश रोग निदान व इको-फ्रेंडली तंत्रज्ञान’ विषयक प्रशिक्षण संपन्न

आयसीएआर–सीआयएफटी मुंबई संशोधन केंद्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन; मत्स्यव्यवसायातील रोग प्रतिबंध, मूल्यवर्धन आणि पर्यायी ऊर्जा उपायांवर सखोल चर्चा

नवी मुंबई | जतिन मोरे 
     जागतिक मत्स्यव्यवसाय दिवसाच्या पार्श्वभूमीवर आयसीएआर–सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी (CIFT) मुंबई संशोधन केंद्रात "फिश रोग निदान, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि इको-फ्रेंडली पोस्ट-हार्वेस्ट टेक्नॉलॉजीज" या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण-सह-जागरूकता कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम NSPAD–PMMSY अंतर्गत आयसीएआर–CIFT नवी मुंबई व आयसीएआर–सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (CIFE) वर्सोवा यांच्या संयुक्त विद्यमाने २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
           या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता ‘रिपोर्ट फिश डिसीज’ अॅप नोंदणी व जनजागृती सत्राने झाली. श्री. साजन यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर आयसीएआर गान सादर करण्यात आले. स्वागत भाषण डॉ. अभय कुमार यांनी केले. यावेळी राष्ट्रपतींचे संदेश आणि “कुपोषणाविरुद्ध लढण्यासाठी मासे” या विषयावर डॉ. आशा के. के. यांनी माहिती दिली. प्रमुख पाहुणे श्री. जनार्दन जाधव (संचालक, कुमारी खुमारी कम्युनिटी इंटरनॅशनल ट्रस्ट) यांनी मत्स्य व्यवसायातील संधी, आव्हाने व नियोजनावर आपले विचार मांडले. यानंतर तज्ज्ञांचे विविध विषयांवरील व्याख्यानांचा क्रम सुरू झाला.

मासे रोग निदान (परजीवी रोगांवर विशेष भर) – डॉ. गायत्री त्रिपाठी

मूल्यवर्धित उत्पादने – डॉ. रेहाना

कोळंबी पालनातील सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती – डॉ. बबिता राणी
      दुपारच्या भोजनानंतर तांत्रिक सत्रात पर्यायी ऊर्जा प्रणाली, प्रोबायोटिक्स आणि प्रतिजैविकांचे पर्याय, तसेच सूक्ष्मजीव रोगजनकांच्या पार्श्वभूमीवर माशांची स्वच्छतापूर्ण हाताळणी या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

श्री. श्रावण शर्मा – पर्यायी इंधन व ऊर्जा प्रणाली

सुश्री आर. भारती रथिनम – प्रोबायोटिक्स : प्रतिजैविकांना पर्याय

डॉ. अभय कुमार – माशांची स्वच्छतापूर्ण हाताळणी
        समारोप सत्रात कार्यक्रमाचा आढावा मांडण्यात आला. आभार प्रदर्शन श्री. श्रावण शर्मा यांनी केले. दुपारी ४.१५ वाजता राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रशिक्षणामुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शेतकरी, संशोधक, प्रशिक्षणार्थी व संबंधित घटकांना रोगनियंत्रण, पर्यावरणपूरक प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि सुरक्षित हाताळणी तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत ज्ञान मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

तळोजा एम.आय.डी.सी परीसरात धावणार मेट्रो

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द