वावोशी भीमनगर येथे महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण

वावोशी भीमनगर येथे महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण; टाटा स्टील फाउंडेशनचा पुढाकार

वावोशी | जतिन मोरे 
     टाटा स्टील फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत वावोशी येथील भीमनगर परिसरात महिलांसाठी दोन दिवसीय डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात परिसरातील ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
       महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, शासकीय योजनांचा स्वतःहून लाभ घेता यावा तसेच मोबाईलचा सुरक्षित व परिणामकारक वापर करता यावा, हा प्रशिक्षणाचा उद्देश होता. प्रशिक्षणादरम्यान डिजिलॉकर, मेरा रेशन, ई-आधार, आयुष्यमान भारत योजना यांसह सायबर सुरक्षितता व मोबाईल सेफ्टीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. टाटा स्टील फाउंडेशनच्या फिल्ड कोऑर्डिनेटर करूणा कदम यांनी डिजिटल साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षक रंजना राणे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मोबाईल ॲप्सचा वापर समजावून सांगितला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये डिजिटल आत्मविश्वास वाढल्याचे सहभागी महिलांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमाला प्रशिक्षक रंजना राणे, फिल्ड कोऑर्डिनेटर करूणा कदम, सीआरपी आश्विनी मोरे, माजी उपसरपंच सुनीता भालेराव, अंगणवाडी सेविका पल्लवी मोरे, दर्शना मोरे, कल्पना मोरे, अरुणा मोरे, साधना मोरे, दीक्षा मोरे, माधुरी शिंदे, कल्पना गायकवाड, आरती मोरे, अंजू मोरे, शोभा मोरे, जीविका मोरे, वैजयंती मोरे, टीना मोरे, पूनम मोरे आदी महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

तळोजा एम.आय.डी.सी परीसरात धावणार मेट्रो

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द