वावोशी मध्ये सतर्कता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन, भारतीय कृषी विमा कंपनी व वावोशी ग्रामपंचायत यांचा पुढाकार

वावोशी मध्ये सतर्कता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन, भारतीय कृषी विमा कंपनी व वावोशी ग्रामपंचायत यांचा पुढाकार

वावोशी/जतिन मोरे :- खालापूर तालुक्यातील वावोशी मधील श्री. द.पा.तथा नाना टिळक प्राथमिक विद्यालयात भारतीय सतर्कता जागरूकता सप्ताह अंतर्गत ३० ऑक्टोबर रोजी शालेय उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार निर्मूलन संदर्भात मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. यावर्षी, केंद्रीय दक्षता आयोगाने ३० ऑक्टोबर २०२३ ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सतर्कता जनजागृती सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने भारतीय कृषी विमा कंपनी व वावोशी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नाना टिळक प्राथमिक शाळेत भ्रष्टाचार निर्मूलन संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला. 
             भ्रष्टाचार ही जागतिक समस्या असून भ्रष्टाचारामुळे राजकीय विकास, लोकशाही, आर्थिक प्रगती, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य यांची हानी होऊन ते नष्ट होते. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी एकत्रित काम करण्यासाठी जनतेला संवेदनशील आणि प्रेरित करणे आवश्यक आहे आणि त्याच उद्देशाने वावोशी मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ग्रामपंचायत आवारातून " भ्रष्टाचार का विरोध करे; राष्ट्र के प्रति समर्पित रहे!" अशी घोषणाबाजी करत प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली व त्यातून निवडक पहिल्या तीन मुलांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले व इतर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात आले व शेवटी मुलांना खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला वावोशी ग्रामपंचायतच्या सरपंच आश्विनी शहासने, उपसरपंच, उपसरपंच दीपाली शिर्के, भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक शरद कबाडे, तालुका समन्वयक गणेश सावंत, ग्रामपंचायत सदस्या रिया वालम, सदस्य मयूर धारवे, ग्रामसेवक विवेक वासकर, मुख्याध्यापिका विद्या घरत, मानसी केदारे, सहशिक्षक सुनील पवार, प्रविण गाढवे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती