“भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक जिंकल्यास मी बीचवर न्यूड धावेन,” अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

“भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक जिंकल्यास मी बीचवर न्यूड धावेन,” अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

     एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान रविवारी (१९ नोव्हेंबर रोजी) होणार आहे. २० वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा फायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या अंतिम सामन्यावर खिळल्या आहेत. यासाठी केवळ क्रीडा प्रेमीच नाही तर बॉलीवूड आणि साऊथ सेलेब्रिटीही खूप उत्सुक आहेत. दरम्यान, आता दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने मोठी घोषणा केली आहे. भारताने विश्वचषक जिंकला तर ती बीचवर न्यूड धावेल, असं तिने म्हटलं आहे.
     या अभिनेत्रीचे नाव रेखा बोज आहे. लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री रेखा बोज हिने इन्स्टाग्रामवर विश्व चषक २०२३ संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच तिने एक मोठी घोषणा केली आणि म्हणाली की जर भारताने विश्वचषक जिंकला तर ती विजाग (विशाखापट्टनम) बीचवर कपड्यांशिवाय धावेल. रेखाने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर याबद्दल पोस्ट शेअर केली. “जर भारताने वर्ल्ड कप जिंकला तर मी विजाग बीचवर स्ट्रीकिंग करेन. टीम इंडियाला शुभेच्छा,” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं. खरं तर स्ट्रीकिंग ही एक परदेशी प्रथा आहे. ज्यात एखाद्या खेळात मोठा विजय मिळाल्यास आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कपड्यांशिवाय धावतात.
    रेखा बोजच्या पोस्टवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. एकाने लिहिले, ‘मग भारत नक्कीच जिंकेल.’ तर दुसऱ्याने लिहिलं, ‘तू हे सर्व लक्ष वेधण्यासाठी करत आहेस. भारतीय संघाच्या नावाने काही बोलू नकोस.’ ‘याची काही गरज नाही,’ असं आणखी एका युजरने लिहिलं.
     रेखा तेलुगू चित्रपटांसाठी ओळखली जाते. तिने ‘मंगल्यम’, ‘स्वाती चिनुकू संध्या लेलेलो’ आणि ‘कलाय तस्मै नमः’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असते. अभिनयाबरोबर ती तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती