तुराडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदी सौ. रंजना विश्वनाथ गायकवाड तर उपसरपंच पदी कु. रिया प्रदीप माळी यांची बिनविरोध निवड

तुराडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदी सौ. रंजना विश्वनाथ गायकवाड
    तर उपसरपंच पदी कु. रिया प्रदीप माळी यांची बिनविरोध निवड

आंदोलन वृत्तसंस्था :-
    शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यात उपसरपंच पदाची निवडणूक निवडून आलेल्या थेट सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. यावेळी तुराडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच सौ. रंजना विश्वनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी शुक्रवारी सकाळी 12 वाजेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी वेळ होती. यावेळेत सकाळी पावणे अकरा वाजता कु. रिया प्रदीप माळी यांनी उपसरपंच पदासाठी फॉर्म भरला असता 12 पर्यन्त दुसऱ्या कुणीही फॉर्म भरला नाही. यामुळे नियमाप्रमाणे दुपारी 1 वाजता अर्ज छाननी करून दुपारी दोन वाजता निवडणूक अध्यक्षा सौ. रंजना विश्वनाथ गायकवाड यांनी कु.रिया प्रदीप माळी यांना बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषित केले. यावेळी जमलेल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून फटाक्यांची आतीषबाजी केली. नंतर बँजो च्या तालावर नाचून आपला आनंद व्यक्त केला.
     यावेळी नवनिर्वाचित सदस्य सौ. मालती संतोष वाघमारे, सचिन रमेश मते, विलास भाऊ पाटील, सौ.लीना मयूर ठाकूर, प्रमिला कृष्णा कातकरी, सौ. स्नेहा स्वपनेश गायकर, सौ. धनश्री अमोल गायकवाड आदी उपस्थित होते.
    यावेळी निरीक्षक म्हणून कर्नाळा मंडळ अधिकारी श्री. मनोज मोरे आणि सचिव म्हणून ग्रामसेविका श्रीम. अस्मिता मोकल यांनी काम पाहिले.
    यावेळी शे.का.प. जेष्ठ नेते जि.प. सदस्य श्री. सुरेशशेठ ठाकूर, मा. पं.स. सदस्य जगदीश पवार, मा. उपसरपंच प्रकाशशेठ माळी, रोटरीयन गणेशशेठ वर्तक, अविनाशशेठ वाघमारे, कृ. उ. बाजार समिती संचालक सुनील शेठ सोनावळे, मा. उपसरपंच विश्वनाथ गायकवाड, प्रदीप माळी, मा. उपसरपंच मनोहर चव्हाण, मा. उपसरपंच सौ. प्रतिभा कोणकर, सुधाकर गायकवाड, उपसरपंच देवेंद्र पाटील, नाना माळी, वामन चव्हाण, अण्णा कोणकर, रमेश मते, आणि ग्रामस्थ वर्ग आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती