व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कोकण प्रदेश समन्वयक फिरोज पिंजारी यांचा बारामतीला विशेष सन्मान

व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कोकण प्रदेश समन्वयक फिरोज पिंजारी यांचा बारामतीला विशेष सन्मान
    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरव

खोपोली (शिवाजी जाधव) : व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे दोन दिवसीय राज्य शिखर अधिवेशन दि. 18 व 19 नोव्हेंबर रोजी बारामती (जि. पुणे) येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात पत्रकारांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, आदर्श सरपंच तथा समाजसेवी पोपटराव पवार, सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, ज्येष्ठ पत्रकार खा. कुमार केतकर, गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील, ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे, महेंद्र पिसाळ, व्हाॅईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, उपाध्यक्ष मंदार फणसे, उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, माजी आमदार रामराव वडकुते आदींनी मार्गदर्शन केले.
       व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारांसाठी झुंजणारी, पत्रकारांच्या उज्वल भविष्यासाठी काम करणारी देशातील नंबर वन संघटना असून पत्रकारांना रोजगार, कौशल्य, आरोग्य, मुलांना उच्च दर्जेदार शिक्षण, इन्शुरन्स, घर आदी पंचसूत्रीवर संघटना काम करीत आहे. गेल्या वर्षभरापासून पत्रकार फिरोज पिंजारी यांनी देशभरातील प्रत्येक राज्यात व्हॉईस ऑफ मीडिया संघटना बांधणीचे काम युद्धपातळीवर करीत देशात संघटना वाढविण्याचे काम केले आहे. 
      बारामती येथील दोन दिवसीय राज्य शिखर अधिवेशनात फिरोज पिंजारी यांच्या कामाचे कौतुक व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले. व्हॉईस ऑफ मीडियाचा बेस्ट राष्ट्रीय संघटना बांधणीचा पुरस्कार व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा कोकण समन्वयक तसेच दैनिक कोकण प्रजा, दैनिक कोकण प्रदेश न्यूज, केपी न्यूज चैनल, केपी न्यूज वेब पोर्टल, कोकण प्रवाह वेब पोर्टल, इंटरपोल & कोकण प्रजा वेब पोर्टलचे मुख्य संपादक फिरोज पिंजारी यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
      बदलत्या काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप बदलत चालले आहे. सन्मान, पुरस्कार किंवा सत्कार हे एक प्रकारे आपण आयुष्यभर दिलेल्या योगदानाची पोचपावतीच असते. मी आयुष्यभर प्रामाणिकपणे केलेल्या सामाजिक कार्याची आणि झुंजार, निर्भीड, निःपक्ष पत्रकारितेची नोंद कुणीतरी कुठेतरी ठेवत होते. खरे तर त्याची पोचपावती मला मिळणार आहे, हे कधी माझ्या ध्यानीमनीही नव्हते. किंबहुना तशी अपेक्षा मी कधी ठेवलीही नव्हती. परंतु, ध्यानीमनी नसतानाच ज्या सुखद घटना घडतात, त्याचा आनंद काय वर्णावा...त्याची गोडीही अवीट असते. माझ्या बाबतीतही अगदी असेच घडले. व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेमध्ये मला काम करण्याची संधी प्राप्त झाल्याने माझ्या जीवनात एक नव्याने ऊर्जा निर्माण झाली अशी भावना पत्रकार फिरोज पिंजारी यांनी व्यक्त केली. पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि समाजातील तळागाळातील कष्टकरी सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांवर सातत्याने आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडणारे पत्रकार फिरोज पिंजारी यांना बारामती येथे व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या अधिवेशनामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आदर्श सरपंच तथा समाजसेवी पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती