राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत शताकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी चार खेळात 120 पदके जिंकून मिळविला विजय...

राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत शताकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी चार खेळात 120 पदके जिंकून मिळविला विजय
    मास्टर ऑफ मास्टर शीतल गायकवाड यांचे सर्वत्र होत आहे कौतुक

खोपोली - 24 डिसेंबर रोजी डेव्हिड ससून औद्योगिक शाळा, माहीम मुंबई महाराष्ट्र अमचुर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन मार्फत महाराष्ट्र शासन आयोजित 23 व्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील शताकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवला असून घेण्यात आलेल्या चार कराटे खेळात 120 पदके मिळवली.
    आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील जवळपास 460 विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेतला असून त्यातून रायगड खोपोली शताकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी 120 पदके मिळवत 64 सुवर्ण, 30 रौप्य आणि 26 कांस्य पदके प्राप्त करून पहिली चॅम्पियनशिप मिळवत आपले कराटे स्पर्धेतील वर्चस्व स्थापित केले आहे.
    याबाबत सर्व विद्यार्थ्यांना कराटे खेळाचे मार्गदर्शन करणाऱ्या मास्टर ऑफ मास्टर 5 th डिग्री ब्लॅक बेल्ट, भारतभूषण शितल गायकवाड, मास्टर विशाल गायकवाड, योगेश गायकवाड, विनया केदार मुंडे, वर्षा उदुगडे, आदित्य महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याबाबत शताकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या कराटे खेळाच्या मुख्य मार्गदर्शन करणाऱ्या मास्टर ऑफ मास्टर, ब्लॅक बेल्ट , भारतभूषण शितल गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती