विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी

विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी

उरण : प्रतिनिधी 
    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रविवारी (दि.3) निकाल जाहीर झालेल्या चारपैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. याबद्दल उरण मधील भाजपच्या तालुका व शहर कार्यालय येथे उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतजबाजी करून, वाद्यांच्या गजरात नाचून व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

    भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवित काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला धोबीपछाड दिला. विजयानंतर पनवेल येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उरण तालुका अध्यक्ष रवी पाटील उरण शहराध्यक्ष उरण नगराध्यक्ष नगरसेवक व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती