खालापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी जाहीर

खालापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी जाहीर


आंदोलन वृत्तसंस्था : (लोहोप) देवा पवार
     आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वामध्ये खालापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी पुढील तीन वर्षाकरीता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यामध्ये प्रवीण जांभळे व रवी पाटील यांच्यावर सरचिटणीस म्हणून जबाबदारी दिली असून संजय देशमुख, समीर म्हात्रे, हेमंत पाटील, किशोर देवघरे हे उपाध्यक्ष असतील. राखी गणेशकर या महिला उपाध्यक्ष असतील.
     चिटणीसांमध्ये चिंतामण पाटील, विकास रसाळ, प्रभाकर सांगळे, यशोदा सचिन मोरे, ताई पुंडलिक पवार व अश्विनी माळी यांना जबाबदारी दिली आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण पार्टे यांच्यावर खजिनदार पदाची जबाबदारी दिली आहे. त्याचबरोबर विविध मोर्चांची देखील घोषणा केली असून महिला मोर्चा अध्यक्षपदी सुजाता पाटील, युवा मोर्चा अध्यक्षपदी नागेश पाटील यांची नेमणूक केली असून अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी राजेंद्र जमदाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध सेल आणि प्रकोष्ट यांची देखील घोषणा करण्यात आली असून कामगार आघाडीचे तालुका संयोजक म्हणून सचिन जाधव, जैन सेल संयोजक म्हणून सागर ओसवाल, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे संयोजक म्हणून दिगंबर सणस, सहकार सेल संयोजक म्हणून संजय पवार, ट्रान्सपोर्ट सेलची जबाबदारी हरिभाऊ जाधव यांच्यावर दिली असून प्रज्ञा प्रकोष्ठ हेमंत गीध हे असतील. दिव्यांग सेलच्या संयोजक पदी मंगेश पार्टे, कायदा सेल संयोजक म्हणून संदेश वनगे, रेल्वे प्रवासी संयोजक म्हणून गौरव प्रकाश कदम, उद्योग आघाडीचे संयोजक म्हणून रवींद्र मोरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. खालापूर शहर अध्यक्षपदी दीपक जगताप व चौक शहर अध्यक्षपदी गणेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच इतर पदाधिकारी व जिल्हा परिषद, पंचायत समिती वार्डांचे अध्यक्ष देखील घोषित करण्यात येतील. या कार्यकारिणीचे अनेकांनी स्वागत केले असून जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, सनी यादव, माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष रामदास ठोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक काशिनाथ पार्टे यांसह अनेकांनी या कार्यकारिणीचे स्वागत केले आहे.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती