रसायनीत येणाऱ्या जैव वैद्यकीय कचराव्यवस्थापनाला मनसेचा प्रखर विरोध...

रसायनीत येणाऱ्या जैव वैद्यकीय कचरा
व्यवस्थापनाला मनसेचा प्रखर विरोध
-दिपक कांबळी

आंदोलन वृत्तसंस्था : रसायनी 
     मुंबई (गोवंडी) येथील जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा एमआयडीसी येथे उभारण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाने दिली आहे. या प्रकल्पामुळे गोवंडी तसेच परिसरातील रहिवाशांना दुर्गंधी वायू प्रदूषण उग्र दर्प यामुळे सातत्याने घुसमट तसेच जीवघेणा आजारांचा सामना करावा लागतो. आणि तो त्रास येथील रहिवाशांना भविष्यात होऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी यांच्यावतीने खालापूर तहसीलदार साहेब व पातळगंगा एमआयडीसी वरिष्ठ व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकारी आणि विभाग यांना निवेदन देण्यात येईल.
    भविष्यात मनसेतर्फे जनजागृती करून या प्रकल्पाविरोधात तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल. मनसेतर्फे सर्व स्थानिक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादी यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून या आंदोलनात भावी पिढी करता स्थानिक स्वच्छ नैसर्गिक संपन्न परिसराकरिता एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध करण्याचे काम करूया, व आवश्यक वाटल्यास सर्वपक्षीय मिळवून एखादी स्थानिक सामाजिक संघटना स्थापन करून एकजुटीने या प्रकल्पाविरोधात आंदोलन उभे करूया. असे आव्हान मनसेचे दीपक कांबळी यांनी केले आहे.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती