ह.भ.प वै. इंदुमती रघुनाथ मोरे यांचं अल्पशा आजाराने निधन

ह.भ.प वै. इंदुमती रघुनाथ मोरे यांचं अल्पशा आजाराने निधन

प्रतिक चाळके : आंदोलन वृत्तसंस्था 
       कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथील ह.भ.प इंदुमती रघुनाथ मोरे यांचे राहत्या घरी दिनांक ०७ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले.
      त्यांच्या मनमिळावू स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली गेली. सर्व समाजामध्ये ऐक्याचे बंधुत्वाचे, शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ती सतत प्रयत्नशील असायची. ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती. अशी व्यक्ती सोडून गेल्याने तिच्या कुटुंब, नातेवाईक, आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्यावरती शोककळा पसरली आहे. 
       त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि. १६ जानेवारी रोजी श्री क्षेत्र तमनाथ येथे ९.३० वाजता होणार असून उत्तरकार्य शुक्रवार दि. १९ जानेवारी रोजी त्यांच्या निवासस्थानी होणार असून या निमित्ताने ह.भ.प श्री रामदास भाई महाराज पाटील खानाव यांचे प्रवचन होणार आहे. 
      वै. ह.भ.प इंदुमती रघुनाथ मोरे यांच्या पच्छात त्यांचे पती, २ मुले, २ मुली, नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती