समरभूमी उंबरखिंडीत ३६३ वा विजय दिन सोहळ्याचे आयोजन

समरभूमी उंबरखिंडीत ३६३ वा विजय दिन सोहळ्याचे आयोजन 
   २ फेब्रुवारी रोजी पार पडणार विजय दिन सोहळा

खोपोली (शिवाजी जाधव)
     चावणी (छावणी ) येथे असलेल्या समरभूमी उंबरखिंडित ३६३ वा विजय दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा विजय दिन सोहळा शुक्रवार २फेब्रुवारी २०२४ रोजी रोजी सकाळी ९:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे, 
         ग्रामस्थ चावणी ,ग्रामपंचायत चावणी, जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती खालापूर आणि शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा विजयदिन सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो, त्याचप्रमाणे यावर्षीही हा विजयदिन सोहळा आयोजित केला असून यावेळीं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे, 
    छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळे घेऊन कारतलब खानाच्या सैन्याचा मोठा पराभव उंबरखिंड येथे करून मोठा विजय मिळवला होता ही लढाई १६६१ सालची असून येथे आजही विजयस्तंभ आहे, त्याचे स्मरण व्हावे म्हणून दरवर्षी विजय दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, 
      तर यावेळी शिवशाहीर रायगड भूषण वैभव घरत यांचा मराठमोळा पोवाडा, आणि शाहिरी कार्यक्रम तर शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान होणार आहे तरी या विजयदिन सोहळ्याला शिवभक्तांनी आणि भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत चावणी आणि चावणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे,

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती