एस.एम.एस.एन्व्होक्लीन बायो मेडिकल वेस्ट या कारखान्यास बोरीवली ग्रामस्थांचा विरोध

एस.एम.एस.एन्व्होक्लीन बायो मेडिकल वेस्ट या कारखान्यास बोरीवली ग्रामस्थांचा विरोध

आंदोलन प्रतिनिधी :- देवा पवार
      खालापुर तालुक्यातील मौजे बोरिवली येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भूसंपादन झालेला प्लॉट नं. ए - दोन या जागेत येणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याचे विल्हेवाट लावणारा एस.एम.एस.एन्व्होक्लीन प्रायव्हेट लिमिटेड हा प्रकल्प बोरीवली येथे येत असल्यामुळे स्थानिकांनी त्यांस विरोध दर्शविला असून असे कारखाने या ठिकाणी येवू नयेत. या संदर्भात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत वडगाव ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच सुरेश पाटील तसेच बोरिवली गावातील संदिप पाटील, सचिन पाटील, वैभव मुंढे, मयुर पाटील आदी ग्रामस्थांनी भेट घेतली.
        या प्रकल्पाबाबत उद्योग मंत्र्यासह अनेक खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना याआधी सुध्दा निवेदने दिले होते. परंतु शासन याबाबतीत उदासीनता दाखवत असल्याकारणाने काल १२ फेब्रुवारी रोजी उद्योग मंत्री उदयजी सामंत यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना याबाबत सविस्तर माहिती देऊन निवेदन देण्यात आले. तसेच या प्रकल्पाला स्थानिक गावपातळीवर कडाडून विरोध होणार असल्याचे देखील स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
     कैरे गाव येथे पूर्वीची गोराडीया केमिकल कंपनीच्या जागेवर नविन कारखाना सुध्दा याच धर्तीवर आधारीत असुन त्याची कल्पना उद्योग मंत्र्यांना देऊन हा प्रकल्प लवकरात लवकर बंद करण्यात यावा असे सुचविण्यात आले आहे.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती