संंत सेवालाल महाराज यांची जंयती तुराडे ग्रामपंचायत व रा.जि.प. कष्टकरीनगर येथे साजरी

संंत सेवालाल महाराज यांची जंयती तुराडे ग्रामपंचायत व रा.जि.प. कष्टकरीनगर येथे साजरी

रसायनी/प्रतिनिधी
     गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत तुराडे आणि रा.जि.प.शाळा कष्टकरीनगर येथे साजरी करण्यात आली. तुराडे ग्रामपंचायत कार्यालयात सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेेचे पुजन सरपंच सौ.रंजना वि. गायकवाड व उपसरपंच कु.रिया प्रदिप माळी यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ भिमु राठोड यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. कष्टकरीनगर शाळेमध्ये प्रतिमेचे पूजन, पुष्पहार माजी उपसरपंच विश्वनाथ वामन गायकवाड यांच्या हस्ते तर श्रीफळ शंकर राठोड यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.
    यावेळी विश्वनाथ गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले कि सेवालाल महाराज यांनी समाजात अध्यात्मिक शिकवन देवुन चांगले संस्कार दिले.त्याचबरोबर अंधश्रद्धेला थारा न देता सोबतच विद्वानाचा आधार देऊन समाजात जनजागृतीचं काम करुन अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम केले असे म्हणाले. यावेळी आनंदित वातावरण झाले होते.
    यावेळी ग्रामसेवक श्रीम.अस्मिता मोकल,अनिता वाघमारे,शंकर राठोड, सुनिल राठोड,काका गायकवाड, हनुमंत साठे,अरुण राठोड, सोमू राठोड,राजू राठोड उपस्थित होते.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती