९ मार्च ला हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन, माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा सभापती सुधाकर घारे यांची पत्रकार परिषद

९ मार्च ला हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन, माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा सभापती सुधाकर घारे यांची पत्रकार परिषद

 खोपोली (शिवाजी जाधव)
      खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खालापूर तालुक्यातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि खेळ रंगला पैठणीचा महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे, हा कार्यक्रम सोहळा शनिवारी 9 मार्च रोजी एसपी ग्राउंड ताकई येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे, त्या अनुषंघाने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा सभापती सुधाकर घारे यांची पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली.
      या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, वरदा सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, टीव्ही मालिका अभिनेत्री अक्षया देवधर, अभिज्ञा भावे, राधा पाटील, आर जे अक्षय आदी उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाला खालापूर तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा सभापती सुधाकर घारे यांनी केले.
        यावेळी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, युवक अध्यक्ष अक्षय पिंगळे, महिला अध्यक्षा आदींसह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती