अभिजीत दरेकर यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड!

अभिजीत दरेकर यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड!

खालापुर : शिवाजी जाधव
    मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुरस्कार वितरण सोहळ्यात अभिजीत दरेकर यांची रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली! राज्यभरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.
     ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२४’ मध्ये राज्यभरातून आलेल्या हजारो अर्जांमधून मोजक्या व्यक्तींना गौरवण्यात आले. यावेळी मंचावर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, मंगलप्रभात लोढा, अमृता देवेंद्र फडणवीस, जॉकी श्रॉफ (अभिनेता), यांसारखे अनेक नामवंत नेते उपस्थित होते.
    या भव्य सोहळ्यास रायगड जिल्ह्यातील मान्यवर पत्रकारांनीही हजेरी लावली होती. रघुनाथ कडू, किरण मोरे, रोहन कडू, सुधीर देशमुख, दीपक जगताप, कृष्णा सगणे, गणेश लोट, संकेत घेवारे, संदेश साळुंके, श्रेयस ठाकूर, महेंद्र आव्हाड यांसारख्या पत्रकारांनी या सोहळ्याला आपल्या उपस्थितीने अधिक रंगत आणली.
    अभिजीत दरेकर यांची निवड म्हणजे रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्राला मिळालेला नवा आवाज आणि बळ! त्यांच्या या मोठ्या जबाबदारीसाठी अनेक मान्यवर, पत्रकार व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रायगड जिल्ह्याच्या पत्रकारितेचे भविष्य आता आणखी उज्ज्वल होणार यात शंका नाही!

Popular posts from this blog

ह.भ.प गणेश महाराज मांडे यांचे दुःखद निधन

आमदार महेंद्र थोरवे यांचा विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक

हिल इंडिया कंपनीत चोरी करणारे आरोपी रसायनी पोलिसांच्या ताब्यात