बी. के. वाडकर इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न...
बी. के. वाडकर इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...
खोपोली : शिवाजी जाधव
शिळफाटा या ठिकाणी असलेल्या बबनराव वाडकर सामाजिक संस्था संचालित , संचालक प्रसाद वाडकर यांच्या बी.के. वाडकर इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी शिळफाटा येथील आंबे माता मंदिर परिसरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आले. यावेळी शिवसेना कर्जत खालापूर संपर्कप्रमुख पंकज पाटील , माजी नगराध्यक्ष सुनील पाटील , माजी उपनराध्यक्ष कुलदीपक शेंडे , RPI युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक , माजी नगरसेवक संजय पाटील , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र फक्के , नंदकिशोर ओसवाल, राजा पाटील, राहुल गायकवाड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलनात बी.के वाडकर इंग्लिश स्कूल मधील प्ले ग्रुप , नर्सरी , ज्युनियर केजी , सिनियर केजी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यानी विविध गण्यानावर नृत करत उपस्थितीत पालक व मान्यवरांचे मनोरंजन केले. सदरील स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी संचालक प्रसाद वाडकर , माजी नगरसेविका मेघा वाडकर , मुख्याध्यापिका साक्षी पाटील , शिक्षिका प्रियंका राक्षे , रसिका निळे सर्व शिक्षक , कर्मचारी इत्यादींनी मेहनत घेतली.