उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खोपोलीत सन्मान कर्तुत्वाचा
उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खोपोलीत सन्मान कर्तुत्वाचा
खोपोली (शिवाजी जाधव)
बुज हास्य परिवाराचा २२ वा वर्धापन दिन शनिवार दि ८ फेब्रुवारी रोजी शहरातील लायन्स सर्विस सेंटर खोपोली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.. घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत , कर्जत खालापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महिंद्र थोरवे व अन्य मान्यवरांच्या हस्ते खोपोली शहरात विविध क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी यशस्वी पार पडलेल्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी बळीराम साखरे यांना खोपोली रत्न , आसावरी दंडवते खोपोली पद्मभूषण , नीता गुप्ता पद्मभूषण , धर्मराज पाटील पद्मश्री , मनेश निमसे पद्मश्री , नंदकुमार ओसवाल दानशूर व्यक्तीमत्व , अमित किस्मततराव मराठी उद्योजक , समीर साठे मराठी उद्योजक , अविनाश किरवे मराठी उद्योजक , प्रशांत गुरव मराठी उद्योजक , नरेंद्र हर्डीकर समाज सेवक इत्यादींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.. उपस्थित मान्यवरांनी बूज हास्य क्लब चे मुख्य बाबूभाई ओसवाल व सर्व परिवाराचे कौतुक केले.