रायगडचा अभिमान! कु. प्रियांका शिंदे मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत दमदार प्रवेश
वावोशीची लेक राष्ट्रीय कबड्डीच्या दिशेने – कु. प्रियांका शिंदेची मुख्यमंत्री चषक स्पर्धेत निवड!
वावोशीची शेरनी कबड्डीच्या मैदानात – प्रियांका शिंदे रायगड महिला संघात
वावोशी / जतिन मोरे – ठाणे येथे होणाऱ्या ७२ व्या पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला स्व. पार्वतीबाई सांडव चषक कबड्डी स्पर्धेसाठी वावोशी गावाची कन्या कु. प्रियांका महादू शिंदे हिची रायगड महिला संघात निवड झाली आहे. १९ ते २३ मार्च २०२५ दरम्यान जे.के. केमिकल क्रीडांगण, ठाणे (पश्चिम) येथे ही प्रतिष्ठित स्पर्धा रंगणार आहे. कु. प्रियांका रायगड महिला संघाकडून खेळत असून, तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर राज्यस्तरीय मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा २०२५ साठी स्थान मिळवले आहे. या निवडीसाठी तिने राज्य अजिंक्यपद निवड चाचणी यशस्वीरीत्या पार केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वावोशी गावासह छत्तीशी विभाग व खालापूर तालुक्यातील क्रीडाप्रेमींकडून तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. प्रियांकाच्या कामगिरीमुळे खालापूर तालुक्यासह वावोशी गावाचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे.