छत्तीशी विभागात राजकीय भूकंप! आरपीआयला नवे बळ | छत्तीशी विभागातील आरपीआय पुन्हा जोमात!
नितीन मोरे यांच्या पुनरागमनाने छत्तीशी विभागात राजकीय भूकंप!
आरपीआयला नवे बळ...
छत्तीशी विभागातील आरपीआय पुन्हा जोमात!
वावोशी / जतिन मोरे :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या छत्तीशी विभागीय अध्यक्षपदी नितीन बबन मोरे यांची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही काळ वैयक्तिक कारणांमुळे राजकारणापासून दूर राहिलेले नितीन मोरे आता नव्या जोमाने पुन्हा मैदानात उतरले आहेत.
२०१४ ते २०२० या कालावधीत त्यांनी आपल्या आक्रमक नेतृत्वाने छत्तीशी विभागात राजकीय वर्चस्व निर्माण केले होते. त्यांची पुनर्नियुक्ती ही ना. रामदासजी आठवले यांच्या आशिर्वादाने, आयु. नरेंद गायकवाड (जिल्हाध्यक्ष, रायगड) यांच्या मार्गदर्शनाखाली व आयु. सुर्यकांत कांबळे (तालुका अध्यक्ष, खालापूर) यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. या निवडीमुळे छत्तीशी विभागात आरपीआय (आठवले) पक्षाला नवे बळ मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नितीन मोरे यांनी पक्षवाढीसाठी आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी पुन्हा झोकून देण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विभागात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे. नितीन मोरे यांच्या पुनरागमनामुळे पक्षाच्या गटबाजीला पूर्णविराम मिळेल का? नव्या ध्येयधोरणांसह संघटन मजबूत करण्यासाठी ते कोणते पावले उचलणार? याकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल आणि नव्या उमेदीने काम करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.