नाम फलक राज्यभाषा मराठीत करण्याचे आदेश असूनही अनेक ठिकाणी नाव इंग्रजी भाषेतच

नाम फलक राज्यभाषा मराठीत करण्याचे आदेश असूनही अनेक ठिकाणी नाव इंग्रजी भाषेतच

खोपोली | प्रतिनिधी
     मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असून महाराष्ट्राच्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यां अधिकारी - कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहे. खोपोली शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, दुकान व इतर ठिकाणी दिसणारे नामफलक मराठीतच असणे बंधनकारक असल्याचे आदेश खोपोली नगरपरिषदेने काही दिवसांपूर्वी दिले असून नामफलक मराठीत करण्याचा काही दिवसांचा कालावधी दिला होता. तसेच नगरपरिषद हद्दीतील सर्व दुकानांचे नामफलक दुकान मालकांनी सुयोग्य आकाराचे मराठी देवनागरी लिपीत करावे असे नामफलक लावण्याची जाहीर सूचना खोपोली नगर परिषदे मार्फत प्रसिद्ध केली असल्याने खोपोली उपशहर प्रमुख राहुल गायकवाड यांच्या मागणीला न्याय मिळणार असे सर्वत्र वातावर होते. परंतु शहरातील अनेक दुकाने, दवाखाने, इमारती, व्यायामशाळा, परमपूज्य गगनगिरी महाराज शाळा इत्यादी ठिकाणी अद्यापही शाळांचे नाव इंग्रजी भाषेतच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात खोपोली नगरपालिका व निवडून दिलेले अधिकारी इंग्रजी भाषेत नाम फलक असलेल्या मालकांवर व संस्थांवर नक्की काय कारवाई करणार ? व खोपोली उपशहर प्रमुख राहुल गायकवाड शिवसेना स्टाईलने कशाप्रकारे आंदोलन करणार याकडे संपूर्ण शहरासह तालुक्याचे लक्ष लागून राहिला आहे.

Popular posts from this blog

ह.भ.प गणेश महाराज मांडे यांचे दुःखद निधन

आमदार महेंद्र थोरवे यांचा विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक

हिल इंडिया कंपनीत चोरी करणारे आरोपी रसायनी पोलिसांच्या ताब्यात