माजी सरपंच बळीराम कांबळे यांच्या पत्नीचे दुःखद निधन

माजी सरपंच बळीराम कांबळे यांच्या पत्नीचे दुःखद निधन

रसायनी | प्रतिनिधी 
     सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बळीराम कांबळे यांची पत्नी सुमन बळीराम कांबळे यांचे दिनांक २४ मार्च २०२५ रोजी आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे सावळे गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे.
    माजी सरपंच बळीराम कांबळे यांच्या पत्नी सुमन बळीराम कांबळे या सन १९८४ मध्ये सावळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्या होत्या. तसेच त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळे त्यांचा गावात व नातेवाईकांमध्ये आदर होता. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचे डोंगर पसरले आहे.
    त्यांच्या पश्चात मुलगा भावेश कांबळे हे सावळे गावचे पोलीस पाटील असून दुसरा मुलगा ज्ञानवर्धिनी विद्यालय सावळे येथे कार्यरत आहे. तर मुलगी लॅब टेकनेशियन असून जावई विकास कांबळे हे महावितरण रसायनी येथे इंजिनिअर आहेत. तसेच नातवंडे, नातेवाईक असा मोठा परीवार आहे. त्यांच्या निधनाने सावळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांचा पुण्यानुमोदन व श्रध्दांजली सभा कार्यक्रम रविवारी दिनांक ०६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वा. सावळे येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी रसायनीतील सर्व सामाजिक, राजकीय नेते, कार्यकर्ते, नातेवाईक, आप्तेष्ट, सगेसोयरे उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

Popular posts from this blog

ह.भ.प गणेश महाराज मांडे यांचे दुःखद निधन

आमदार महेंद्र थोरवे यांचा विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक

हिल इंडिया कंपनीत चोरी करणारे आरोपी रसायनी पोलिसांच्या ताब्यात