खोपोलीतील उद्योजक यशवंतशेठ साबळे यांचा अचानक भाजप पक्ष प्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ...

खोपोलीतील उद्योजक यशवंतशेठ साबळे यांचा अचानक भाजप पक्ष प्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ...

खोपोली | प्रतिनिधी : दिनांक 15 जून रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील CKT कॉलेज मध्ये भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष, मंत्री रवींद्र चव्हाण, यांच्या हस्ते व आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उत्तर रायगड महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खोपोलीतील नामवंत उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे यशवंतशेठ साबळे, माजी नगरसेवक अविनाशभाऊ तावडे, युवा उद्योजक विक्रमशेठ साबळे यांनी आपल्या शेकडो सहकारी मित्रांसोबत अचानक भाजप पक्षात प्रवेश केला. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र चर्चा रंगली आहे. साबळे यांच्या प्रवेशामुळे भाजपची स्थिती खोपोली शहरात मजबूत होणार असून याचा फायदा निश्चितच पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनाही होणार आहे.
      राजकारणापासून दूर असणारे यशवंतशेठ साबळे यांच्या अचानक राजकारणात प्रवेशामुळे सर्वत्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या प्रवेशाने खोपोलीच्या राजकारणात अनेकांना नक्की धक्का बसला अशी ही चर्चा आहे. यशवंत शेठ साबळे यांचा कोणताही राजकीय संबंध नसला तरी त्यांनी शहरात अनेक यशस्वी कामे पार पाडली आहेत. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात देखील त्यांनी अनेक चांगली कामे करून घेतली , महाराजा मंगल कार्यालया बाजूला कशी स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन करून शहरातील तरुणांना विविध खेळ उपलब्ध केले अशी एक ना अनेक सामजिक व जनतेच्या उपयोगी पडलेली कामे त्यांनी केली आहेत. याची दखल भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष व मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली असून पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष आग्रहामुळे त्यांचा पक्ष झाला असे बोलले जाते.
        यावेळी खोपोलीतील उद्योजक यशवंतशेठ साबळे, माजी नगरसेवक अविनाश तावडे, युवा नेते विक्रम साबळे, उद्योजक सुहास वझरकर, इर्शाद खान, चिराग राव, भीमा मोरे, युवा नेते अजिंक्य तावडे यांसह अनेकांचा भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर , जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उत्तर रायगड महिला आघाडी अध्यक्ष अस्विनी पाटील ताई, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस बेहेरे, खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव, खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

ह.भ.प गणेश महाराज मांडे यांचे दुःखद निधन

आमदार महेंद्र थोरवे यांचा विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक

रिसमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस