ताराराणी ब्रिगेडच्या मध्यस्थीने सनशिल्ड केमिकल कंपनीमध्ये बंदिस्त असलेला क्रेन मशीन मुख्य मालकाच्या ताब्यात
ताराराणी ब्रिगेडच्या मध्यस्थीने सनशिल्ड केमिकल कंपनीमध्ये बंदिस्त असलेला क्रेन मशीन मुख्य मालकाच्या ताब्यात
आंदोलन | प्रतिनिधी : पाली - सुधागड तालुक्यातील पाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सनशिल्ड केमिकल कंपनीमध्ये पुण्यातील अन्सारी नामक मालकाचा क्रेन मशीन गेली सात महिने चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करण्यात आला होता. क्रेन मशीन मालक अन्सारी आपले क्रेन कंपनी बाहेर काढण्यासाठी अनेक पद्धतीने प्रयत्न करत होते. परंतु काही करूनही त्यांच्या मालकीचा बंदिस्त असलेला क्रेन मशीन बाहेर काढणे शक्य न्हवते. खुप प्रयत्न करूनही अस्वस्थ झालेल्या मालकाने ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदनाताई मोरे यांची भेट घेत मदतीची विनवणी केली. क्रेन मशीनवर अन्सारी यांचा कुटुंबीयांचा उदरनिर्वाह असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली हे ओळखून वंदनाताई मोरे यांनी पाली पोलिस ठाण्यात भेट घेत पोलिस निरीक्षक चव्हाण मॅडम यांच्याकडे तोंडी तक्रार केली. सदरील प्रकरण लक्षात घेत चव्हाण मॅडम यांनी सनशिल्ड केमिकल कंपनी व्यवस्थापन यांना बोलून घेत त्यांचे म्हणणे एकूण घेत त्यावर मार्ग काढावा असे सांगितले. कंपनीने सुद्धा वंदनाताई आणि पोलिस निरीक्षक चव्हाण मॅडम यांच्या विनंतीला मान देऊन वरिष्ठांसोबत बोलणे करून दोन मशीन देण्याचे आश्वासन दिले. दिलेल्या शब्दाचे पालन करून अखेर सात महिने काही कारणास्तव बंदिस्त केलेला क्रेन मशीन मालकाच्या ताब्यात दिल्याने ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदनाताई मोरे यांनी सनशिल्ड केमिकल कंपनी मालक, व्यवस्थापन व पोलिस निरीक्षक चव्हाण यांचे आभार मानले. तसेच क्रेन मशीनचे मालक अन्सारी यांनी सुद्धा ताराराणी ब्रिगेडचे आभार मानले.. यावेळी रायगड जिल्हा अध्यक्षा कविता खोपकर उपस्थित होत्या..
ताराराणी ब्रिगेड ही एक सामाजिक संस्था आहे. यामार्फत त्यांनी अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार होणार नाही याची मनात जाण ठेऊन काम केले जाते. रायगड जिल्हा सह संपर्ण महाराष्ट्रत व अनेक राज्यात ब्रिगेडचे काम सुरू असून नागरिकांच्या सेवेसाठी कायम झटणारी संस्था असल्याचे प्रदेश अध्यक्षा वंदनाताई मोरे यांनी माहिती दिली.
Comments
Post a Comment