शिवसहयाद्री सेवा सहकारी संस्थेच्या वतीने नेरळ ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपण

स्वा. माँ साहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळ (दादर) अंतर्गत 
    शिवसहयाद्री सेवा सहकारी संस्थेच्या वतीने नेरळ ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपण

आंदोलन वृत्तसेवा : शिवाजी जाधव
    पृथ्वीभोवती हवेत गोळा होत असलेल्या कार्बनडाय ऑक्साइडसारख्या वायूंमुळे जागतिक तापमानात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे अनेक भागात उष्णतेच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यापासून बाचावाकरिता परिसरात वृक्षरोपण करणे आवश्यक असल्याने फुलबाजार व्यापारी मंडळ (दादर) अंतर्गत शिवसहयाद्री सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार व व्यापारी पदाधिकारी यांनी कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत 200 कडुलिंबू झाडांचे रुक्षरोपण केले. घेण्यात आलेल्या वृक्षारोपन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई दादर येथील नेते मनोज कुंडे , मच्छिंद्र शेलार , नेरळचे ग्रामसेवक सुदाम कारले व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.. मागील वर्षी देखील खालापूर तालुक्यातील खोपोली शिळफाटा हद्दीत फुलबाजार व्यापारी मंडळ (दादर) यांनी 200 विविध जातीची झाडे लावली होती. व वर्षी त्यांनी कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत कडुलिंबाची 200 झाडे लावण्यात आली.
         यावेळी संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार , फुलमर्किटचे सचिव संस्थेचे सल्लागर अजय कौसाले , सचिव योगेश बागल , खजिनदार बापूसो लोळे , संचालक तुषार भोसले , जगन्नाथ टेकवडे , हरिदास मांजर्डेकर , अमोल भाई , विरेन्द्र जाचक , समाधान जगदाळे , स्वप्निल खांडगे , राजेंद्र पवार, शंकर लोहे तसेच संस्थेचे शेकडो कार्यकर्ते त्याचबरोबर नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमा प्रसंगी जागतिक तापमान उष्णतेत वाढ होत असून यापासून बाचावाकरिता वृक्ष रोपण करणे आवश्यक असल्याचे शिवसेना नेते मनोज कुंडे , मच्छिंद्र शेलार , फुलबाजार व्यापारी मंडळ (दादर) संस्थेचे अध्यक्ष अविरज पवार व पदाधिकरी यांनी वृक्षारोपण करून इतरांनी सुद्धा वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे सांगत माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

ह.भ.प गणेश महाराज मांडे यांचे दुःखद निधन

आमदार महेंद्र थोरवे यांचा विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक

रिसमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस