हिल इंडिया चे माजी कर्मचारी ए.एस.लोखंडे यांची शोकसभा शोकाकुल वातावरणात संपन्न
हिल इंडिया चे माजी कर्मचारी ए.एस.लोखंडे यांची शोकसभा शोकाकुल वातावरणात संपन्न
रसायनी : प्रतिनिधी
रसायनी परिसरातील केंद्र सरकारचा उपक्रम असणाऱ्या हिल इंडिया कंपनीचे माजी कर्मचारी व मुळ गाव महाड येथील ए.एस.लोखंडे यांचे रविवार दि. 22 जुन रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यावेळी मोहोपाडा येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांचा अंत्यविधी पार पाडला गेला. त्यावेळी त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, कंपनीतील आजी माजी सहकारी आदी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांना अंदाजे एक मुलगा व दोन मुली असल्याची माहिती आहे.
त्यांचा शोकसभा व पुण्यानुमोदन कार्यक्रम काल रविवार दिनांक 29 रोजी मोहोपाडा आळी आंबिवली येथील राहत्या घरी पार पडला. यावेळी बौद्धाचारी यांच्यावतीने धम्म पूजा पाठ करून पुण्यानुमोदन कार्यक्रम पार पाडला. तर सामाजिक कार्यकर्ते एन एम वाघमारे, ऍड. दांडगे, मुख्याध्यापक पी. एल गायकवाड, भोजने आदींनी लोखंडे यांच्या जीवन कार्यावर विचार प्रकट करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी वक्त्यांनी लोखंडे यांनी कंपनीत केलेल्या कार्याचा पाढा वाचला, तर सामाजिक कार्यात आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी किती सहभाग घेतला होता याची देखील वक्त्यांनी आपल्या भाषणात ग्वाही दिली. यावेळी एन. एम. वाघमारे, ऍड. दाडंगे, पी. एल. गायकवाड, दिपक कासारे, बी. डी. सोनावणे, परिसरातील समस्त नागरिक, सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते, कंपनीतील आजी माजी कर्मचारी, नातेवाईक व सहकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment