राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांनी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप
एक पाऊल शिक्षणाकडे...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांनी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप
खालापूर | राहुल जाधव
दरवर्षीप्रमाणे यावर्षी जनता विद्यालय जुनियर कॉलेज मोहॊपाडा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना चे माजी विद्यार्थी यांच्यावतीने वतीने आज शनिवार दिनांक 5 जुलै 2025 रोजी रा. जि. प. शाळा पानशील तालुका खालापूर जिल्हा रायगड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अहिरे सर, मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती वाघ सर, आकृती अकॅडमी चे संचालक म्हात्रे सर, संस्थेच्या संचालिका म्हसकर मॅडम, चव्हाण सर, टाकेदेवी विद्यालयाचे गावित सर, सौदागर सर, कार्यक्रमाधिकारी कोंडीलकर सर, शेलार सर मा. विद्यार्थी प्रतिनिधी पत्रकार प्रतिक चाळके, शाळेच्या मुख्याध्यापिका साबले मॅडम, शिक्षक विटकर सर तसेच एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य अहिरे सर व चव्हाण सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेच्या मुख्याध्यापिका साबळे मॅडम यांनी आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment