खोटं - पण रेटून बोलण्याची आमदार महेंद्र थोरवे यांची पद्धत आहे - सुधाकर घारे
खोटं - पण रेटून बोलण्याची आमदार महेंद्र थोरवे यांची पद्धत - सुधाकर घारे
खोपोली | शिवाजी जाधव
खोटं पण रेटून बोलण्याची आमदार महेंद्र थोरवे यांची पद्धत असल्याने मला कधीच कुठल्याच भांडणात मदत केलेली नसून ते माझे कधीच मित्र नव्हते, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांनी देत राजकारणात कायमचा प्रतिस्पर्धी सुधाकर घारेच असेल... माझे आ. थोरवे काही मित्र नसून, मला काही मैत्री करायची नाही, असे परखड मत सुधाकर घारे यांनी व्यक्त केले.
आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दरम्यान शुक्रवार दिनांक ११ जुलै २०२५ रोजी ११.०० वाजता घेण्यात आलेल्या रॉयल गार्डनच्या भव्य आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन, नवीन पद निवड, अनेकांचा पक्ष प्रवेश व निवडणुका संदर्भात विचार मंथन, यावर हि बैठक चांगलीच गाजली.
यावेळी व्यासपीठावर या बैठकीस राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा सरचिटणीस एकनाथ दादा धुळे, कर्जत शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर, मा. राजिप सभापती नारायण डामसे, युवा विधानसभा अध्यक्ष कुमार दिसले, नवनिर्वाचित कर्जत ता. अध्यक्ष दिपक श्रीखंडे, अशोक सावंत , महिला विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर, कर्जत ता. अध्यक्षा ऍड. रंजना धुळे, अजय , तालुका उपाध्यक्ष रवी झांझे, जिल्हा उपाध्यक्ष हिंदोळा, माळी, विधानसभा संघटक धोंडू राणे, आदी उपस्थित होते यावेळी शेकाप , काँग्रेस , शिवसेना या पक्षातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश झाला.
Comments
Post a Comment