कै. कु‌.सार्थक खराडे याच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रम

कै. कु‌.सार्थक खराडे याच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रम

रसायनी | प्रतिनिधी 
    रसायनी मोहोपाडा येथील पत्रकार राकेश खराडे व वासंबे ग्रामपंचायत सदस्या रसिका खराडे यांचा चिरंजीव कै.कु.सार्थक राकेश खराडे याच्या सहाव्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, भूमी अभिलेख, तहसिलदार खालापूर, चौक ग्रामीण आरोग्यकेंद्र व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खालापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.24 जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    नागरिकांना आपल्या मालमत्तेचे शासकिय दस्तऐवज काढताना अनेक चक्रा मारुनही काम होत नसल्याने ग्रामस्थ नागरिकांत नाराजी दिसून येत होती. शिवाय भविष्यात वासांबे मोहोपाडा नगरपरिषद होण्याची चिन्हे असल्याने आपल्या मालमत्ता असल्याचे शासन सनद, मालमत्ता पत्रक (प्रापर्टी कार्ड) काढण्यासाठी अनेकवेळा भूमी अभिलेख विभागात नागरिक जावूनही काम होत नव्हते. हि समस्या पत्रकार राकेश खराडे यांनी जाणली व शासनाकडे मागणी केली. त्यानुसार शासन महसूल भुमीअभिलेख विभागाकडून वासांबे मोहोपाडा हद्दीतील ग्रामस्थांना जागेच्या शासन सनद वाटप, सिटी सर्व्हे नंबर शोधणे व मालमत्तापत्रक(प्रापर्टी कार्ड) काढून देणे तसेच नागरिकांना हाॅस्पिटलात मोफत उपचार करता यावेत यासाठी आरोग्य विम्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड काढून देणे. तसेच शालेय विद्यार्थ्यांची व जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, एच.आय.व्ही तपासणी, डोळे तपासणी या कार्यक्रमांचे आयोजन मोहोपाडा येथील श्री दत्त मंदिराच्या सभामंडपात गुरुवार दि.24 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळात करण्यात आले आहे. तर जनता विद्यालय मोहोपाडा शाळेतील राष्ट्रीय सेवा योजनेतील (NSS)च्या 35 विद्यार्थी व शिक्षकांना मोफत कै.सार्थक खराडे प्रिंटेड टि शर्ट वाटप करणे, जनता विद्यालयातील मराठी माध्यमाच्या पहिली ते चौथीच्या 150 विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्याचा कार्यक्रम जनता विद्यालय शाळेच्या सभामंडपात दुपारी 12 वाजता होईल. तसेच वासांबे मोहोपाडा हद्दीतील पाच ते दहा वयातील गरजू व गोरगरीब मुलांना मोफत कपड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खालापूर तालुका शासकिय अधिकारी आणि खालापूर तालुक्यातील पत्रकार बांधव परिश्रम घेत आहेत.
   कै. कु‌.सार्थक राकेश खराडे याच्या स्मरणानिमित्त दरवर्षी परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम आयोजिले जातात‌‌. यावर्षी परिसरातील नागरिकांसाठी आगळावेगळा समाजसेवी कार्यक्रम घेतल्याने ग्रामस्थांसह नागरिकांकडून कै. कु.सार्थकच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

ह.भ.प गणेश महाराज मांडे यांचे दुःखद निधन

आमदार महेंद्र थोरवे यांचा विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक

रिसमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस