साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
रसायनी | प्रतिनिधी
शुक्रवार दिनांक १८ जुलै २०२५ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ५६ व्या स्मृतिदिनी ग्रामपंचायत तुराडे सरपंच सौ.रंजना विश्वनाथ गायकवाड, उपसरपंच सौ.मालती संतोष वाघमारे, मा. उपसरपंच रिया माळी, सदस्य सौ. स्नेहा गायकर, ग्रामपंचायत अधिकारी अस्मिता मोकल, मा. उपसरपंच विश्वनाथ गायकवाड व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
तसेच मौजे कष्टकरीनगर येथेहि अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून उपस्थितांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी रासायनी परिसरातील अनेक बांधव उपस्थित होते. यावेळी मा. उपसरपंच विश्वनाथ गायकवाड यांनी उपस्थिताना अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती अण्णाभाऊंचे संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा, मुंबई महाराष्ट्रातच राहावी,कामगारंचे प्रश्न, आणी दीड दिवस शाळेत जाऊन भलं मोठं साहित्य, पोवाडे, चित्रपट कथा लिहून महाराष्ट्रासाठी मोठं योगदान आसल्याचे सांगितले. तसेच मातंग समाज रसायनी परिसरात मोठया संख्येने उपस्थित असूनहि समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यावेळी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
Comments
Post a Comment