रसायनीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
रसायनीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
रसायनी | राहुल जाधव
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव विकास समिती व रसायनी पाताळंगा परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने वासंबे मोहॊपाडा ग्रामपंचायत, तुराडे ग्रामपंचायत, वावेघर ग्रामपंचायत, गुळसुंदे ग्रामपंचायत व कष्टकरी नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वासंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक कांबळे, सदस्य संदीप मुंढे, आकाश जुईकर, पत्रकार राकेश खराडे, गौतम सोनावणे, ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विश्वनाथ गायकवाड यांनी सांगितले की, रसायनीतील खाने आंबिवली गावात मातंग समाजाचे 25 ते 30 कुटुंब राहत असून गेले पंचवीस वर्षांपासून ते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र त्यांना रमाई घरकुल योजना तर्फे घरकुले मंजूर झाले होते. परंतु जागे अभावी त्यांची घरे झाले नाहीत. तरी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्यांच्या जागेचा प्रश्न सोडवून त्यांना घरकुल मिळावे अशी विनंती केली. यावेळी उपसरपंच दीपक कांबळे यांनी उपस्थितांना अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती सांगितली तसेच खाने आंबिवली येथील मातंग बांधवांचा घराचा प्रश्न सोडवू असे देखील आश्वासन दिले. तर या आश्वासनाला विद्यमान सदस्य संदीप मुंढे यांनी दुजारा दिला.
यानंतर हिल इंडिया कंपनीतील एस.सी/एस.टी असोसिएशन, गुळसुंदे ग्रामपंचायत, तुराडे ग्रामपंचायत, कष्टकरी नगर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रतिमेला अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सुजित सोनावळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती दिली. यानंतर ग्रामपंचायत वावेघर येथे सरपंच गीतांजली गाताडे गुरुनाथ गाताडे, विश्वनाथ गायकवाड, काका गायकवाड यांच्या हस्ते तर सरपंच रंजना गायकवाड व उपसरपंच मालती संतोष वाघमारे, मा. उसरपंच रिया प्रदिप माळी, ग्रामपंचायत अधिकारी अस्मिता मोकल यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. तसेच कष्टकरी नगरमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित काळोखे, लंकेश खवळे, सल्लागार कृष्णा झोंबाडे, विश्वनाथ गायकवाड, काका गायकवाड, उमेश खुडे, काशिनाथ खुडे, भानुदास गायकवाड, विनोद कांबळे, प्रथमेश गायकवाड, नंदू गायकवाड, सुरेश म्हस्के, ललकार खवळे, रणजित गायकवाड, अल्हाट, समाधान खवळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment