डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रसायनी येथे कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण शिबिर उत्साहात

अखिल भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रसायनी येथे कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण शिबिर उत्साहात
      माता रमाई जयंतीनिमित्त आयोजन; प्रा. आनंद देवडेकर यांचे कार्यकर्ता आचारसंहितेवर मार्गदर्शन, १५० उपासक - उपासिका उपस्थित


वावोशी | जतिन मोरे
      रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अखिल भारतीय बौद्ध महासंघ या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने जिल्हा रायगड स्तरावर माता रमाई जयंतीचे औचित्य साधून कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर रसायनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रसायनी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा रायगड शाखेचे अध्यक्ष दीपक श्रीधर खाडे होते, तर उद्घाटक म्हणून संस्थापक व राष्ट्रीय महासचिव व्ही.जे.गायकवाड उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पूज्य भंते अधिचित्तो यांनी आशीर्वादपर मार्गदर्शन केले.
      या शिबिराची सुरुवात पंचशील ध्वजारोहणाने झाली. आप्पा साळवे यांनी ध्वजवंदन गीत सादर केले. त्यानंतर आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सदर शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून ‘सद्धम्म’ पत्रिकेचे संपादक प्रा. आनंद देवडेकर यांनी “कार्यकर्त्यांची आचारसंहिता” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यकर्ता कसा असावा, कसा नसावा, काय व किती बोलावे, कसे बोलू नये यावर त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. तसेच माता रमाईंचा त्याग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९५६ मधील ऐतिहासिक भाषणाचा संदर्भ देत प्रशिक्षणार्थींना प्रेरित केले. अखिल भारतीय बौद्ध महासंघाचे संस्थापक व्ही. जे.गायकवाड यांनी संघटनेचा २६ वर्षांचा प्रवास उलगडून सांगितला. यावेळी अध्यक्षीय भाषणात दीपक खाडे यांनी “बौद्ध धम्म या देशातून कधीच संपणार नाही, आम्ही तो संपू देणार नाही,” असा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी धम्मपिठावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिलीप मोरे, उपाध्यक्ष अनंता शिंदे, सचिव मनोरमा गायकवाड, संघटक आप्पा साळवे, संघटिका ज्योतीताई खाडे, राज्याध्यक्ष सुधाकर मेढे, कार्याध्यक्ष रमेश डोंगरे, उपाध्यक्ष कविताताई ढोले, ज्ञानेश्वर धनवे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यकारिणीतील जितेंद्र जाधव, अरविंद गायकवाड, उषाताई इंगोले, राम मोरे, नामदेव मोरे, अनिल कांबळे, शांताराम सोनवणे, गोविंद कांबळे, प्रकाश खंडागळे, सिद्धार्थ ढोले, सुधीर ढोले, आनंद पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तालुका स्तरावर खालापूरचे अध्यक्ष राकेश गायकवाड, कर्जतचे सतीश देशपांडे, पेणचे पांडुरंग मोरे, खालापूर मधून सुनील सोनावणे, दीपक गायकवाड, सुरेश डोंगरे, जगदीश कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. एकूण सुमारे दीडशे उपासक-उपासिका या शिबिरात सहभागी झाले होते. सर्व प्रशिक्षणार्थींना ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम सोनावळे यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला. दिवंगत दीपक ढोले यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून चहा व अल्पोपहार देण्यात आला तर भोजनाची व्यवस्था आनंद पवार यांनी केली. शेवटी पूज्य भंते अधिचित्तो यांच्या धम्मदेसनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द

गागोदे खुर्दमध्ये आरक्षण घोटाळा? अनुसूचित जातीचा हक्क हिरावला...